
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दर वाढ झाल्याने ग्राहकांना याची मोठी झळ बसणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी गणपतीचा सण आहे. त्यामुळे अनेकजण सोने आणि चांदीच्या दागिने आणि वस्तूंची गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी खरेदी करत असतात.त्यांना आता याची झळ बसणार आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांची तर चांदीच्या दरात 8 हजारांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संधीची दारे उघडी झाली आहेत, तर घरगुती सण- सोहळ्यासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना झळ बसणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply