• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Medalist Amardip : देशासाठी जिंकलं गोल्ड मेडल, आज रस्त्यावर विकतोय भाजी, व्हिडीओ पाहून धक्काच बसेल!

August 30, 2026 by admin Leave a Comment


Gold Medalist Now Selling Vegetables : एखाद्या खेळात सर्वोत्तम ठरणं ही काही सोपी गोष्ट नसतो. कठोर मेहनत, साधना, सातत्य या सर्वांची जोड असेल तरच खेळात मनासारखी कामगिरी करता येते. आजघडीला याच मेहनतीच्या जोरावर काही खेळाडूंनी भारताचे नाव जगभरात पोहोचवलेले आहे. ऑलिम्पिकासरख्या खेळात सुवर्णपदक जिंकून अनेक खेळाडूंनी मोठं नाव कमवलेलं आहे. परंतु आपल्या याच भारत देशात असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी कटोर परिश्रम घेतले, खेळातील नाविण्य दाखवून दिले. परंतु आज परिस्थिती अभावी हे खेळाडू गायब झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका खेळाडूची खूप चर्चा होत आहे. मागे मिळालेली सुवर्णपदके लवटकवून हा खेळाडू चक्क भाजी विकत आहे.

तब्बल चार वेळा परदेशवारी केली

भारतासाठी मैदानात उतरलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या अमरदीप कुमार यांची कहाणी समोर येताच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमरदीप कुमार यांनी थ्रोबॉल या खेळप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल चार वेळा परदेशवारी केली आणि मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत मोठे नाव कमवले. त्यांच्या कामगिरीमुळे झारखंडचे नावही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले.
पण आज परिस्थिती वेगळी आहे.

सोशल मीडियावर अमरदीप यांच्या परिस्थितीची चर्चा सुरू

ज्या हातांनी कधीकाळी सुवर्णपदकाला हात लावला, त्याच हातांनी आता रांचीच्या अरगोड़ा चौकात उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर अमरदीप यांच्या परिस्थितीची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या संघर्षाची कहाणी पुन्हा समोर आली आहे. उपलब्ध वृत्तांनुसार त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील यशानंतर आर्थिक आणि रोजगाराच्या संधी कितपत मिळतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमरदीप कुमार।नाम सुनकर लगता है कोई कहानी होगी। है भी।

चार बार विदेश गया, भारत की जर्सी पहनी, मलेशिया में थ्रोबॉल में गोल्ड जीतकर तिरंगा लहराया।

झारखंड का नाम रोशन किया लेकिन आज वही अमरदीप रांची के अरगोड़ा चौक पर धनिया-मिर्च तौल रहा है।

वाह री सरकार….. pic.twitter.com/XOj9gpC1gB

— Vivek Mishra (@Viveksagarbjp) August 30, 2026

पदके जिंकतात आणि राष्ट्राचा गौरव वाढवतात, पण…

आज ही परिस्थिती फक्त अमरदीप यांचीच नाही. ही त्या अनेक खेळाडूंची व्यथा आहे, जे देशासाठी मैदानात घाम गाळतात, पदके जिंकतात आणि राष्ट्राचा गौरव वाढवतात; मात्र निवृत्तीनंतर किंवा क्रीडा कारकिर्दीतील अडचणींनंतर त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहतो. अशा खेळाडूंसाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली जात आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
  • पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो, युरोपच्या राजकुमारीशी लग्न करणार ? सोशल मीडियावर हंगामा
  • Sadabhau Khot : ‘पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले’, मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
  • 31 August Horoscope : नोकरी, घर, पैसा, 4 राशींचे नशीब फळफळणार, वाचा आयुष्यात काय बदल होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in