
सोन्याचे दर पुन्हा एकदा चांगलेच कडाडले आहेत, सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत असून सलग तीन दिवसांपासून किंमतीमध्ये वाढ सुरू आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी पहायला मिळत आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ कायम आहे.
सोन्याच्या दरात प्रति तोळा 2 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे आता सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1 लाख 64 हजार 79 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 56 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 7 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 19 हजार रुपयांची वाढ झाली आहे.




Leave a Reply