• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम

June 10, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीकडूनही काही जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, नाशिक विधान परिषद मतदारसंघातील तिढा अद्याप कायम असून, तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

नाशिकमधील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना गोकुळ गीते यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होणार नाही. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचेही गोकुळ गीते यांनी सांगितले. “आमचा प्रचार सुरू आहे आणि आम्ही निवडणुकीच्या तयारीत आहोत,” असेही ते म्हणाले. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेर काय घडामोडी घडतात आणि गोकुळ गीते आपली उमेदवारी कायम ठेवतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in