
वाळवंट म्हणजे काय? : वाळवंट म्हणजे असा प्रदेश जिथे वर्षभरात 25 सेंटीमीटर (सुमारे 9.8 इंच) पेक्षा कमी पाऊस पडतो आणि जमीन अत्यंत कोरडी व कमी सुपीक असते.
भारतातील सर्वात मोठे वाळवंट : जगातील मोठ्या वाळवंटांबद्दल आपण शाळेत शिकतो, पण भारतातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे थार वाळवंट. हे वाळवंट जैसलमेरमध्ये आहे.
‘गोल्डन सिटी’ : येथे सुंदर वाळूचे ढिगारे आणि विस्तीर्ण मैदाने पाहायला मिळतात. जैसलमेर हे थार वाळवंटातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असून त्याला ‘गोल्डन सिटी’ असेही म्हणतात.
थार वाळवंट कुठे पसरले आहे? : थार वाळवंट भारताच्या उत्तर-पश्चिम भागात पसरलेले आहे, विशेषतः राजस्थानमध्ये. याचा काही भाग गुजरात, पंजाब आणि हरियाणा पर्यंत विस्तारले आहेत. याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 2 लाख चौरस किलोमीटर आहे.
दिल्लीसारखी 130–135 शहरे : थार वाळवंट इतके विशाल आहे की त्यात दिल्लीसारखी सुमारे 130 ते 135 शहरे मावू शकतात. दिल्लीचे क्षेत्रफळ सुमारे 1484 चौरस किलोमीटर आहे, त्यामुळे थारमध्ये इतकी शहरे सहज बसू शकतात.




Leave a Reply