• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात? भारताचा कितवा नंबर? तुमचाही विश्वास बसणार नाही

June 6, 2026 by admin Leave a Comment


जगातल्या प्रत्येक देशामध्ये खान पानाच्या सवयी या वेगवेगळ्या दिसून येतात. जगात प्रामुख्याने आहाराचे दोन प्रकार पडतात, एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? जगातील कोणत्या देशामध्ये सर्वाधिक शाकाहारी लोकांची संख्या आहे? तर याचं उत्तर आहे, भारत. भारतामध्ये जगातील सर्वाधिक जास्त शाकाहारी लोकं राहतात. भारत हा जगातील असा एकमेव देश आहे, जिथे तब्बल 40 टक्के लोकसंख्या ही शाकाहारी आहे. जगाच्या इतर कोणत्याही देशांसोबत शाकाहाराच्या बाबतीमध्ये भारताची तुलना केल्यास भारताचं स्थान हे सर्वात वर आहे. आकडेवारीनुसार भारतामधील 27.6 कोटी लोकं असे आहेत, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यामागे हे देखील एक कारण असू शकतं की भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या हिंदू धर्माची आहे, तसेच देशात जैन समाजाची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर मॅक्सिकोचा नंबर लागतो. या देशाबाबत अनेकांचा असा गैरसमज आहे की, मॅक्सिकोला सर्वात जास्त मांसहार करणार देश मानलं जातं. मात्र हा समज चुकीचा आहे. मॅक्सिकोमध्ये तब्बल 19 टक्के लोकसंख्या ही शाकाहारी आहे. आकेडवारीमध्ये बोलायचं झाल्यास मॅक्सिकोमधील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 2.38 कोटी लोकं असे आहेत, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. तुम्हाला हे ऐकून अश्चर्य वाटेल की जगातील सर्वाधिक मांस उत्पादक देशांच्या यादीमध्ये सहभागी असलेला ब्राझील या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये जवळपास 14 टक्के लोकं हे पूर्णपणे शाकाहारी आहेत, ते मासांहार करत नाहीत. ब्राझीलमधील जवळपास 2.9 कोटी लोकं हे कुठल्याही प्रकारचा मांसहार करत नाहीत.

तैवान या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तैवानमधील जवळपास 13 ते 14 टक्के लोकं हे पूर्णपणे शाकाहारी आहेत. तैवानमध्ये बौद्ध धर्मीयांची संख्या ही अधिक असल्यामुळे या देशात शाकाहाराचा मोठा प्रभाव आहे. येथील लोकं मोठ्या संख्येनं शाकाहाराचं सेवन करतात. तर या यादीत पाचव्या स्थानावर इस्त्रायलचा नंबर लागतो. इस्त्रायलमधील 14 टक्के लोकं हे पूर्णपणे शाकाहारी आहेत.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..
  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in