• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gen Z सोबत आता सरकार साधणार थेट संवाद, केंद्रीय मंत्र्यांकडे नवी जबाबदारी, काय आहे नवी योजना?

August 20, 2026 by admin Leave a Comment


तरुण पिढी जेन झेड सोबत जास्तीत जास्त संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक नवी योजना बनवली आहे.  या योजनेंतर्गत दर दिवशी एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठाला भेट देण्याचं नियोजन सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा तरुणांसोबत थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, विविध मुद्द्यांवर देशातील तरुणांचे विचार जाणून घेणे, हा असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण होतं. त्यानंतर दिल्ली येथील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभारण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं जेन झेड सहभागी झाले होते, या सर्व पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवस एक विद्यापीठ कार्यक्रमांतर्गत केंद्रीय मंत्र्यांना दररोज एका विद्यापीठाचा दौरा करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री विद्यापीठांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देखील देणार आहेत.

नव्या शिक्षण मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि युवक कल्याण तसेच क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर सरकारकडून या उपक्रमाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विद्यापीठ आणि केंद्रीय मंत्री यांच्यामधील समन्वयाची जबाबदारी या दोन मंत्र्यांकडे असणार आहे. हे दौरे नियमीतपणे सुरू राहणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. विद्यापीठ आनुदान आयोग युजीसीनुसार देशभरात जवळपास 1300 विद्यापीठ आहेत. केंद्रीय मंत्री आता या विद्यापीठांना भेट देणार आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in