• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअ‍ॅक्शन चर्चेत, चेहरा पाहण्यासारखा

August 19, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL Test: गॉलमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत असला तरी, मैदानावर घडलेल्या एका घटनेने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे नाराज पाहायला मिळाले. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या नो-बॉलमुळे क्रीजवर स्थिरावलेल्या श्रीलंकन ​​फलंदाज धनंजय डी सिल्वाला मोठा दिलासा मिळाला. चेंडू जडेजाच्या गोलंदाजीला बॅटची कड लागून स्लिपमध्ये झेलबाद झाला, परंतु मैदानातील पंचांनी ओव्हरस्टेपिंगमुळे तो नो-बॉल ठरवला, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये गंभीरची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.

भारतीय संघासाठी हा क्षण आणखी वेदनादायी होता, कारण जडेजाने आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजाला पूर्णपणे चकवले होते. त्याचा उंच टाकलेला चेंडू वेगाने वळला, धनंजयच्या बॅटची बाहेरील कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये सुरक्षितपणे आला. भारताला एक मोठी विकेट मिळाली होती, परंतु पंचांच्या नो-बॉलच्या इशाऱ्यामुळे निराशा पसरली आणि धनंजयला जीवदान मिळाले.

🚨Ravindra Jadeja’s No-Ball Turns Gambhir’s Celebration Into Heartbreak🚨

Ravindra Jadeja thought he had dismissed Dhananjaya de Silva after KL Rahul completed the catch, and Gautam Gambhir was visibly delighted.

But then came the heartbreak Jadeja had overstepped, and it was… pic.twitter.com/FbSG0mGhZq

— Central Cricket (@arshdeep3444) August 18, 2026

गंभीर नेहमीच नो-बॉलसारख्या चुकांच्या विरोधात ठाम राहिला आहे. 2023 मध्ये, जेव्हा अर्शदीप सिंगने सलग तीन नो-बॉल टाकले, तेव्हा गंभीरने ठामपणे सांगितले होते की “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा चुकांना स्थान नसावे. “भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना जडेजाचा निष्काळजीपणा पाहून गंभीरचा संताप स्पष्टपणे दिसून आला.

नो-बॉलची ही समस्या बऱ्याच काळापासून जडेजाशी जोडली गेली आहे. आकडेवारी पाहता, जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 84 नो-बॉल टाकले आहेत. भारताने श्रीलंकेसमोर 372 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पहिल्या डावात 178 धावांची आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघ दुसऱ्या डावात 193 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 84 धावांत चार महत्त्वाच्या विकेट गमावल्या. मोहम्मद सिराजने निशांका मदुशंका, मानव सुथारने लाहिरू उदारा, पसिंदु सूरियाबंदारा यांना, तर प्रसिद्ध कृष्णाने कामिंदू मेंडिसला बाद केले. धनंजय डि सिल्वाला रवींद्र जडेजाने बाद केले. निरोशन डिक्लेवाला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. श्रीलंकेला विजयासाठी अजून 197 धावांची गरज असून, त्यांच्या चार विकेट शिल्लक आहेत. आता भारतीय संघ पहिला कसोटी सामाना जिंकणाच्या उंबरठ्यावर आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in