• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 स्पर्धेतून पाच मोठे संघ आऊट, एका संघाने चार वेळा पटकावलं होतं जेतेपद

June 4, 2026 by admin Leave a Comment


फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशांकडे आहे. यंदा स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची संख्या 32 वरून 48 झाली आहे. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीत यंदा 48 संघ असणार आहेत. त्यामुळे यंदा हा वर्ल्डक खास असणार आहे. पण या 48 संघात चार वेळा जेतेपद मिळवणारा इटली संघ नाही. त्यासोबत अजून चार संघही या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेले नाहीत. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इटलीसोबत नायजेरिया, डेनमार्क, पोलँड आणि युक्रेन या देशाचे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेले नाहीत. इटली या स्पर्धेत पात्र ठरू न शकल्याने सर्वात जास्त आश्चर्य वाटत आहे. कारण इटलीने चार वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

इटली स्पर्धेसाठी अपात्र ठरला, कारण की…

इटलीने 1934 मध्ये पहिल्यांदा फिफा वर्ल्डकप जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 1938 मध्ये जेतेपद राखण्यात यश मिळवलं होतं. म्हणजेच सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 1982 मध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. तर 2006 मध्ये चौथ्यांदा जेतेपदाचा चौथा गोल मारला होता. त्यानंतर जेतेपदासाठी संघर्ष करताना दिसला. इतकंच काय तर सलग तिसऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही. 2018 मध्ये रशियात, 2022 मध्ये कतार आणि 2026 मध्येही पात्र ठरू शकला नाही. 2026 च्या पात्रता फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये बोस्निया आणि हर्झेगोविनाकडून पराभव झाल्यामुळे फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. फिफा जागतिक क्रमवारीत इटलीचा संघ 12व्या स्थानी आहे.

इटलीप्रमाणे डेन्मार्कची स्थितीही तशीच आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला आणि वर्ल्डकप स्पर्धेला मुकला. फिफा जागतिक क्रमवारीत डेनमार्क संघ 20व्या स्थानी आहे. मागील फिफा विश्वचषकात एक अनपेक्षित दावेदार मानले जात होता. पण यंदा पात्र ठरू शकला नाही. फिफा क्रमवारीत 26 व्या स्थानावर असलेला नायजेरिया देश यावर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरला नाही. सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप खेळण्यापासून वंचित राहिला. युक्रेनलाही शेवटचा वर्ल्डकप खेळून 20 वर्षे झाली आहे. 32व्या क्रमांकावर असलेला युक्रेन संघ यंदाही पात्र ठरला नाही. पोलँडची स्थितीही तशीच आहे. मागच्या वर्षी स्पर्धेत खेळला आणि बाद फेरीपर्यंत पोहोचला होता. पण यंदा स्पर्धेतून आऊट झाला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in