
बहुप्रतिक्षित फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 11 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी तब्बल 48 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे हे जाणून घेऊयात. (Photo: Getty Images)
फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 1930 पासून खेळवण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेचं 23 वं पर्व असणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम हा किलियन एमबाप्पे याच्या नावावर आहे. (Photo: Getty Images)
फ्रान्सच्या हा स्टार खेळाडू आतापर्यंत 2 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला आहे. दोन्ही वेळा या स्टार खेळाडूच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. एमबाप्पेने दोन्ही अंतिम सामन्यात गोल केले आहेत. एमबाप्पेच्या नावावर अंतिम फेरीत सर्वाधिक 4 गोल करण्याचा विक्रम आहे. (Photo: Getty Images)
एमबाब्पे याच्यानंतर या यादीत पेले आणि झिनेदिन झिदान हे दोघे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. या दोघांनी प्रत्येकी 3-3 गोल केले आहेत. तर अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेसी आणि ब्राझीलचा रोनाल्डो या दोघांनी प्रत्येकी 2-2 गोल केले आहेत. (Photo: Getty Images)
तसेच एका अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही एमबाप्पे याच्या नावावर आहे. एमबाप्पे याने 2022 साली अर्जेंटीना विरुद्ध अंतिम सामन्यात 3 गोल केले होते. (Photo Credit: Getty Images)




Leave a Reply