• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : या पाच मूर्ती घरात हव्याच, आयुष्यात कधी धन कमी पडणार नाही, फेंग शुईमध्ये काय सांगितलंय?

September 9, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे देखील एक वास्तुशास्त्रच आहे. पूर्वी फेंग शुई शास्त्र हे फक्त चीनमध्येच वापरलं जात होतं. मात्र काळाच्या ओघात आता हे शास्त्र जगभरात प्रसिद्ध झालं आहे. अनेक देशातील लोक चांगल्या भाग्यासाठी फेंग शुईमध्ये जे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ते उपाय करताना दिसतात. साधारणपणे ज्या पद्धतीने वास्तुशास्त्र हे प्रामुख्याने दोन घटक निगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा यावर काम करतं, त्याच प्रमाणे फेंग शुई शास्त्रामध्ये देखील या दोन मुख्य संकल्पना आहेत. फेंग शुई शास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते, तेव्हा हळुहळु तुमच्या घरातील पॉझिटिव्ह ऊर्जा कमी होऊ लागते, ज्याचा अशुभ परिणाम हा कुटुंब प्रमुखावर तसेच त्या कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील पडतो. या उलट जर समजा तुमच्या घरात सतत पॉझिटिव्ह ऊर्जेची निर्मिती होत असेल तर त्याचा शुभ प्रभाव हा सर्व घरावर होतो, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही मूर्ती आहेत, ज्या तुमच्या घरात असतील तर त्यामुळे घरात सतत पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आज आपण अशाच काही मूर्तींबद्दल आणि त्यांच्या प्रभावाबद्दल फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हत्तीची मूर्ती – फेंग शुई शास्त्रामध्ये हत्तीच्या मूर्तीला अतिशय शुभ मानलं गेलं आहे. हत्तीला आर्थिक स्थैर्य आणि ऊर्जेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, अशा घरात कधीही पैशांची कमी पडत नाही, असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. पैसा हातात टिकून राहतो.

धावत्या घोड्यांची मूर्ती – वास्तुशास्त्र तसेच फेंग शुई शास्त्रामध्ये धावत्या घोड्याला गती आणि प्रगतीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरात धावत्या घोड्याची मूर्ती असावी असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरात धावत्या घोड्याची मूर्ती असते, अशा घराची भरभराट होते, असं फेंग शुई शास्त्र सांगतं.

कासवाची मूर्ती – फेंग शुई शास्त्रानुसार कासवाला स्थिरतेचं प्रतिक माण्यात आलं आहे, जर तुमच्या घरात प्रचंड पैसा येत असेल परंतु तो जर टिकत नसेल तर अशा घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवावी, असं फेंग शुई शास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in