• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : या चार मूर्ती घरात ठेवणं खूपच शुभ, आयुष्यच बदलून जातं

August 19, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे एक असं शास्त्र आहे, जे शास्त्र तुमच्या घरातील नकारात्मक शक्तिचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय सांगतं. भारतामध्ये जसं वास्तुशास्त्र आहे, तसंच फेंग शुई देखील आहे. फेंग शुईची सुरुवात चीनमध्ये झाली, परंतु त्यानंतर हळुहळु संपूर्ण जगभरात फेंग शुईचा प्रसार झाला. फेंग शुईनुसार जेव्हा घरात नकारात्मक शक्ती निर्माण होते, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसं की काहीही कारण नसताना तुमचे तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत भांडणं होऊ शकतात. पती-पत्नीचं पटत नाही, किंवा सर्व सुरळीत सुरू असताना अचानक एखादं मोठं संकट येतं. या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरातील नकारात्मक शक्तिंचा प्रभाव दूर करणं गरजेचं असतं, यामध्ये तुम्हाला फेंग शुईची मदत होऊ शकते. फेंग शुईमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. फेंग शुईनुसार अशा काही मूर्ती आहेत, त्या जर तुम्ही घरात ठेवल्या तर त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत मिळते, चला तर मग जाणून घेऊयात, फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

लाफिंग बुद्धा – फेंग शुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवणं हे अत्यंत शुभ आहे. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन, सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. घरात ऊर्जा संतुलन सांधलं जातं. ज्याचा खूपच चांगला परिणाम हा तुमच्या मनावर तसेच तुमच्या करिअरवर होतो, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

तीन पायाचा बेडूक – फेंग शुईनुसार घरात तीन पायाच्या बेडकाचा आयडॉल ठेवणं देखील शुभ मानलं जातं, अनेकांच्या हातात पैसा टिकत नाही, जर तुम्हाला देखील ही समस्या असेल तर फेंग शुईमध्ये घरात तीन पायाच्या बेडकाची आयडॉल ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

हत्तीची मूर्ती – हिंदू धर्मामध्ये देखील हत्तीला शुभ माण्यात आलं आहे, तसेच चिनी वास्तुशास्त्र असलेल्या फेंग शुईमध्ये देखील हत्तीचं विशेष महत्त्व आहे. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते. सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून तुमचं संरक्षण होतं, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

धावता घोडा – जर तुम्हाला वारंवार कामांमध्ये अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही घरात धावत्या घोड्याची मूर्ती ठेवा असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे, यामुळे तुमचे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in