• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : धनाचा वर्षाव करणाऱ्या मूर्ती, आजच घरी आणा, आयुष्यच बदलून जाईल

May 23, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई नुसार आपल्या भोवती ज्या काही वस्तू असतात त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडत असतो, काही वस्तुंमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर काही वस्तुंमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा या उलट परिस्थिती पहायला मिळते. फेंग शुईनुसार अशा काही मूर्ती असतात, ज्या मूर्ती तुम्ही तुमच्या घरात आणल्यास तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक आडचणी दूर होतात. घरातील कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नात वाढ होते, एवढंच नाही तर तुम्ही जो पैसा कमवतात, तो तुमच्या हातात टिकून राहतो, खर्च होत नाही. अनावश्यक खर्चाला ब्रेक लागतो, अशाच काही मूर्तींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ज्या मूर्ती घरातं आणंण हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे.

तीन पायाचा बेडूक – फेंग शुईनुसार तीन पायाच्या बेडकाची मूर्ती घरात ठेवणं हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे. या मूर्तीमुळे पैसा, धन, संपत्ती चुंबकाप्रमाणे तुमच्या घराकडे आकर्षित होते. घरातील नकारात्मक वातावरण दूर होतं, तसेच तुमच्या उत्पन्नामध्ये देखील मोठी वाढ होते, कधीकधी अकस्मात धनप्राप्तीचा योग देखील जुळून येतो, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

लाफिंग बुद्धा – फेंग शुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवणं हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे. या मूर्तीमुळे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या तर दूर होतातच, परंतु जर कोणत्याही कारणामुळे घरात सारखे वाद विवाद होत असतील, तर त्याचं प्रमाण देखील कमी होतं. घरात शांती राहते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. लाफिंग बुद्धाच्या मूर्तीला सुख, समुद्धी आणि शांतीचं प्रतिक माण्यात आलं आहे.

हत्तीची मूर्ती – वास्तुशास्त्र तसेच फेंग शुईमध्ये देखील हत्तीच्या मूर्तीला खूपच शुभ माण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार हत्ती हा ताकद आणि समृद्धीचं प्रतिक आहे. त्यामुळे ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, अशा घरात कधीही धनाची कमी भासत नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची आर्थिक संकट दूर होतात, त्यामुळे घरात हत्तीची मूर्ती असावी असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

घोडा – फेंग शुई शास्त्रानुसार जर तुमच्या घरात धावत्या घोड्याची मूर्ती असेल तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत नाहीत, तसेच सर्व प्रकारच्या संकटांमधून तुमचं संरक्षण होतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in