• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ePik Pahani: बळीराजासाठी आनंदवार्ता! ई-पीक पाहणीत मोठा बदल, शेतकर्‍यांच्या मानगुटीवरील ते ओझे हलके

June 30, 2026 by admin Leave a Comment


e Pik Pahani Farmer: राज्यातील शेतकर्‍यांना ई-पीक पाहणीचा चांगलाच फटका बसत होता. तांत्रिक कारणांमुळे ई पीक पाहणी फसत होती. पीक नोंदणीतील अडचणींमुळे पुढे अनेक अडचणी येत होत्या. त्यांचे नुकसान होत होते. आता राज्य सरकारने ई-पीक पाहणीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी तांत्रिक अडचणींमुळे होणारे नुकसान बंद होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांच्या खांद्यावरील ओझे हलके

सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी यावर्षीपासून शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज उरली नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद थंडावला आहे. तांत्रिक अडचणीमुळे पीक नोंदणी होत नव्हती. त्यामुळे या प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळाला होता. अल्प प्रतिसाद लक्षात घेत यंदापासून पीक नोंदणीसाठी सहाय्यकांची नोंदणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यात 15 जुलैपासून ई-पीक पाहणी

राज्यात 15 जुलैपासून ई-पीक पाहणी होणार आहे. यंदा या प्रक्रियेसाठी सहाय्यक नियुक्त करण्यात येणार आहे. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जातील आणि पीक माहिती संकलीत करतील. त्याची अॅपमध्ये नोंदणी करतील. शेतकऱ्यांना यापुढे ॲप हातळण्याची गरज नसेल. या प्रक्रियेला गती देण्यासाठी महिला बचत गटांच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्यामार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल. ॲग्रीस्टॅकशी संलग्न, मोबाईलवरील मॅसेज पीक पाहाणीची माहिती थेट ॲग्रीस्टॅक प्रणालीशी संलग्न असतील. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची माहिती मॅसेजद्वारे कळेल.

शेतकर्‍यांना मोठा फायदा

ई-पीक ॲपमध्ये अचूक नोंदणीसाठी आता सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यावरील पीक नोंदणी अचूक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची डिजिटल नोंदणीसाठी ईपीक पाहणी करण्यात येते. ई-पीक पाहणी नोंदणीत पीक, क्षेत्रफळ आणि लागवडीची माहिती ऑनलाईन नोंदवली जाते. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, पिकांनुसार कर्ज पुरवठ्यासाठी आणि पीक विमा दाव्यासाठी ही माहिती सातबारावर नोंद असणे आवश्यक ठरते.

शेतकऱ्यांसाठी सुटका

ईपीक पाहणीची नोंद करण्याचे काम याअगोदर शेतकऱ्यांना करावे लागत होते. शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करावी लागत होती. अनेकदा सर्व्हर डाऊन, नेटवर्कची अडचण आणि ॲप हँग होण्यासारख्या तांत्रिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. नवीन नियमान्वये पीक पाहणीची अचूकता वाढवण्यासाठी अंतराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात, हद्दीपासून 20 मीटरच्या आत उभे राहूनच त्यांना पिकाचे फोटो काढावे लागणार आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in