• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENGW vs INDW 3rd T20i Final : इंग्लंडचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून अंतिम सामन्यासाठी मोठा बदल, कुणाला संधी?

June 4, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया वुमन्स यांच्यात टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. उभयसंघातील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे टाँटनमधील कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. इंग्लंडने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

श्रेयांका पाटील हीचा  पत्ता कट

इंग्लंडने मालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. श्रेयांका पाटील हीला प्लेइंग ईलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. श्रेयांकाच्या जागी क्रांती गौड हीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात क्रांती कशी कामगिरी करते याकडे निवड समितीचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया मालिका विजयासह दौऱ्याचा शेवट करणार?

टीम इंडियाने या मालिकेत विजयाने सुरुवात केली होती. त्यामुळे भारताकडे सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने दुसऱ्या आणि करो या मरो अशा सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडने यासह मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना अटीतटीचा झाला आहे. त्यामुळे आता सामना आणि मालिका कोणता संघ जिंकतो हे थोड्याच वेळात निकालानंतर स्पष्ट होईल.

इंग्लंडने टॉस जिंकला

🚨 Toss 🚨

England have won the toss and elected to field first against #TeamIndia

Updates ▶https://t.co/2XzV0gvJUv #ENGvIND pic.twitter.com/L7DDXAw1Vi

— BCCI Women (@BCCIWomen) June 2, 2026

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटीया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्री चरणी आणि नंदीनी शर्मा.

इंग्लंड वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफिया डंकली, डॅनी व्याट-हॉज, एमी जोन्स (विकेटीपर), ॲलिस कॅप्सी, हेदर नाईट, फ्रेया केम्प, डॅनिएल गिब्सन, शार्लट डीन (कर्णधार), सोफी एक्लस्टोन, लिन्सी स्मिथ आणि लॉरेन बेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…
  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in