
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची दाणादण उडवून दिली. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपत नाही तर पाकिस्तानचा संघ 171 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 409 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 238 धावांची आघाडी घेतली. या धावांची आघाडी मोडून काढताना पाकिस्तान संघाची दाणादाण उडाली. अवघ्या 135 धावांवर सर्व संघ बाद झाला. यासह इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 103 धावांनी विजय मिळवला.
Leave a Reply