
जो रूटची इंग्लंडचा कर्णधार म्हणून नवी इनिंग सुरू झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात एक योगही जुळून आला आहे. यात एक अंक काही केल्या जो रूटचा पाठलाग सोडत नाही. हा अंक आहे 66.. (Photo: PTI)
लीड्स हे जो रूटचं होमग्राऊंड असून पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरला. इंग्लंडचा कर्णधार म्हणून हा जो रूटचा 66वा सामना आहे. (Photo: PTI)
पाकिस्तानचा संघ 171 धावांवर सर्व बाद झाल्यानंतर इंग्लंडची फलंदाजी आली. पहिल्या डावात जो रूटने अपेक्षित कामगिरी केली आणि अर्धशतक ठोकलं. पण शतकापर्यंत मजल मारता आली नाही. जो रूट 66 धावा करून बाद झाला. (Photo: PTI)
आता योगायोग असा की… जो रूट इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 66 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानात उतरतो. त्याामुळे 66 अंकाचा एक विचित्र संयोग नव्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात जुळून आला आहे. (Photo: PTI)
जो रूटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक विक्रमही नोंदवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कर्णधार 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)




Leave a Reply