• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NZ : रॉबिन्सन-एटकिन्सनचा पंच, न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा, इंग्लंडची विजयी सलामी

June 7, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेट टीमने मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. इंग्लंडने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिल्या सामन्यातील चौथ्याच दिवशी रविवारी 7 जून रोजी न्यूझीलंडवर 115 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडने न्यूझीलंडला 138 रन्सवर गुंडाळलं. ओली रॉबिन्सन आणि गस एटकीन्सन या दोघांनी इंग्लंडच्या विजयात बॉलिंगने प्रमुख योगदान दिलं. मात्र ओली रॉबिन्सन याला’मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

इंग्लंडचा पहिला डाव

न्यूझीलंडने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधार टॉम लॅथम याचा निर्णय योग्य ठरवला. न्यूझीलंडने इंग्लंडला 140 रन्सवर गुंडाळलं. इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 56 धावा केल्या. हॅरीच्या या खेळीमुळे इंग्लंडला 100 पार मजल मारता आली. तर न्यूझीलंडसाठी कायल जेमीसन याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या.

इंग्लंडला 27 धावांची आघाडी

इंग्लंडला 140 धावा करुनही पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने न्यूझीलंडला पहिल्या डावात 113 रन्सवर ऑलआऊट केलं. इंग्लंडसाठी ओली रॉबिन्सन याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या.

इंग्लंडचं द्विशतक

इंग्लंडकडे पहिल्या डावातील 27 धावांची आघाडी होती. तर इंग्लंडने दुसऱ्या डावात 226 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडला 200 पार पोहचवण्यात डेब्युटंट एमिलियो गे याने सर्वाधिक योगदान दिलं. गे याने 57 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 254 धावांचं आव्हान मिळालं. तर न्यूझीलंडसाठी नॅथन स्मिथ याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या.

न्यूझीलंडचं पॅकअप, इंग्लंड विजयी

न्यूझीलंडला दुसऱ्या डावात कमबॅक करुन विजयी होण्याची संधी आहे. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. इंग्लंडने न्यूझीलंडला 40.3 ओव्हरमध्ये 138 रन्सवर ऑलआऊट केलं.

इंग्लंडची विजयी सलामी

YES BOYS! 🦁

A winning start to our Test match summer 💪

Victory by 115 runs at Lord’s pic.twitter.com/ZeIdjrV39X

— England Cricket (@englandcricket) June 7, 2026

इंग्लंडसाठी ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक आणि नाबाद 44 धावा केल्या. डेव्हॉन कॉनव्हे याने 41 धावा जोडल्या. तर केन विलियमसन याने 18 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडसाठी गस एटकीन्सन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. ओली रॉबिन्सन आणि जोश टंग या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन बेन स्टोक्स याने 1 विकेट मिळवली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in