• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

E20 पेट्रोल वाहनाचे इंजिन खराब करते? व्हायरल दाव्यांत सत्य नेमके काय ?

July 3, 2026 by admin Leave a Comment


1. अफवा- एक लिटर इथेनॉल बनवण्यास 10,000 लिटर पाणी

सत्य काय ? – सोशल मीडियावर दावा केला जातो की इथेनॉल तयार करण्यासाठी दहा हजार लिटर पाणी खर्च होते. मात्र हा आकडा चुकीचा आहे. इथेनॉल प्लांटमध्ये एक लिटल इथेनॉल तयार करण्यासाठी केवळ ३ ते ५ लिटर प्रोसेस्ड पाण्याची गरज असते. आधुनिक डिस्टीलरी झिरो लिक्विड डिस्चार्ज ( ZLD) तंत्राचा वापर केल्यास हे पाणी पुन्हा वापरता येते. तसेच आता इथेनॉल उत्पादनात आता मक्याचा वापर वेगाने वाढत आहे. ज्यात तांदुळाच्या तुलनेत कमी पाणी लागते.

2. अफवा- E20 एक नविन आणि जोखीमेचा प्रयोग

सत्य काय ? -E20 भारतात केला जाणारा एक जोखीमपूर्ण प्रयोग आहे. सरकारने यास नकार दिला आहे. इथेनॉलचा उपयोग गेल्या १०० वर्षापासून होत आहे.अमेरिकेत E10 सामान्य इंधन आहे. आणि तेथे E15 आणि E85 देखील वापरले जाते. ब्राझील येथे आधीपासूनच E27 लागू असून त्यास 35 टक्के वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे.कॅनडा, जपान, थायलंड आणि अनेक युरोपीयन देशात देखील इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर होतो.

3. अफवा- मायलेज कमी होतो

सत्य काय ? E20 इंधनाने कारचा मायलेज कमी होतो असे म्हटले जाते. मात्र ते देखील दीशाभूल करणारे आहे. ARAI, IOCL, IIP डेहराडून आणि SIAM ने केलेल्या प्रदीर्घ चाचणी कारला 40,000 किलोमीटर आणि दुचाकींना 20,000 किलोमीटर चालवले. यावेळी मायलेजवर काही परिणाम झाला नाही. मायलेड केवळ इंधनावर अवलंबून नसते. ड्रायव्हींगची पद्धत, टायर प्रेशर,सर्व्हींसिंग, इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर अशा गोष्टींचाही त्यावर परिणाम होतो.

4. अफवा- इंजिनाच्या पार्ट्सना

सत्य काय – सरकारने या विषयावर ARAI द्वारे अभ्यास केला होता. त्यात इंजिन, धातू आणि प्लास्टीकच्या पार्ट्सना कोणतीही गंभीर समस्या झाली नाही. केवळ काही जुन्या वाहनात रबरच्या सील वा गॅस्केटला वेळेआधी बदलावे लागले.याशिवाय E20च्या वापराने कार्बन मोनोऑक्साईड आणि न जळालेल्या हायड्रोकार्बन सारख्या प्रदुषकाचे उत्सर्जन देखील कमी आढळले.

5. अफवा- वारंटी आणि इंश्योरेंस प्रभाव

सत्य काय – सोशल मीडियावर E20 पेट्रोलच्या वापराने वॉरंटी आणि इंश्योरन्स संपतो. सरकारने यास चूकीचा दावा म्हटले आहे. वाहन निर्मिती कंपन्या आणि विमा कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की E20 पेट्रोलचा वापर केल्याने वाहनांची वॉरंटी वा विम्यावर कोणताही परिणाम होणार नाही. SIAM आणि PIB Fact Check ने दाव्याचे खंडन केले आहे.

6. अफवा – पेट्रोल टँकला मुंग्या लागतात

सत्य काय – E20 पेट्रोलमध्ये इथेनॉल ऊसाच्या रसापासून बनत असल्याने मुंग्या आणि मधमाशा येतील असा दावा केला जातो. BPCL ने याचे खंडन केले आहे. इंधनातील इथनॉल प्रक्रीया केलेले असते.त्यात साखरेचा अंश नसतो. तसेच यात असे पदार्थ मिक्स असतात जे किटकांना दूर ठेवतात.

7. अफवाह- पेट्रोलमध्ये थेट ऊसाचा रस

सत्य काय – या इंधनात थेट ऊसाचा रस नसतो तर संपूर्ण प्रक्रिया केलेले इथेनॉल असते. त्याच्या गुणवत्तेची तपासणी करुन पेट्रोलमध्ये मिक्स केले जाते.

8. अफवा- फ्यूएअ टँकमध्ये पाणी

E20 पेट्रोलने वाहनाच्या इंधन टाकीत पाणी जात नाही. आधुनिक वाहने आणि पेट्रोल पंपात असे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व्यवस्था असते, त्यामुळे पाणी टँकमध्ये प्रवेश करत नाही.

9. अफवा- E20 एक “प्रयोग” आहे ?

सत्य काय – सरकारने हा दावा देखील फेटाळला होता की सुप्रीम कोर्टात सरकारने E20 ला एक प्रयोग म्हटले होते. अटर्नी जर्नल कार्यालयाने स्पष्ट केले आहे की कोर्टात असे कोणतेही प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. मीडियाने याचे चुकीचे रिपोर्टिंग करु नये.

10. अफवा – इथेनॉल प्लांट शेतकरी आणि पर्यावरणाला नुकसान

आधुनिक इथेनॉल प्लांट पर्यावरणाच्या सर्व नियमांचे पालन करते. Zero Liquid Discharge सारख्या तंत्राचा वापर करते. शेतकऱ्यांना 1.60 लाख कोटी रुपयांची मोबदला दिलेला आहे. ९३० लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन देखील कमी होते. आणि 310 लाख मेट्रिक टन कच्च्या इंधनाची बचत होते.

2001 मध्ये सुरुवात

भारतात इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाची सुरुवात २००१ मध्ये झाली होती. आधी ५ टक्के इथेनॉल मिक्स करुन चाचण्या केल्या आणि अनेक राज्यात याचा प्रसार केला. २००९ मध्ये राष्ट्रीय बायोफ्युल धोरणात २० टक्के इथेनॉल लक्ष्य ठेवले. त्यानंतर नवीन धोरण, गुंतवणूक आणि उत्पादन वाढवल्यासाठी अनेक पावले उचलली. २०१३-१४ मध्ये ३८ कोटी लिटर वरुन उत्पादन २००० कोटी लिटर प्रतिवर्षे झाले.डिसेंबर २०२५ मध्ये भारताने वेळे आधीच २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे टार्गेट गाठले. सरकारच्या आकड्यांनुसार या इंधनाने १.९० लाख कोटीचे परकीय चलन वाचले आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
  • Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
  • मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in