• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

July 17, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, आणि त्यानंतर मध्य पूर्वेत भीषण युद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेनं देखील त्यानंतर इराणवर हल्ला केला. अमेरिका आणि इस्त्रायलकडून युद्धादरम्यान इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला, परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. दरम्यान हे युद्ध सुरू असातना अमेरिकेनं भारताला मोठा झटका दिला आहे, तर त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचा थेट मोठा फायदा झाल्याचं आता समोर आलं आहे.

गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा एकदा इराण आणि अमेरिकेमधील युद्ध चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेनं गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, या हल्ल्यांमध्ये इराणच्या 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेकडून इराणचे विमानतळं, रेल्वे पूल आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं. परंतु मोठी बातमी म्हणजे या युद्धादरम्यान अमेरिकेनं भारताला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेकडून चाबहार बंदर उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. हा भारतासाठी मोठा झटका मानला जात आहे, कारण भारताने या बंदरामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमेरिकेनं या बंदरावर हल्ला केला आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. चाबहार बंदरावर हल्ला करण्याची ही अमेरिकेची तिसरी वेळ आहे.

भारताला झटका कसा?

भारतासाठी हे बंदर अतिशय महत्त्वाचं आहे, कारण चाबहार बंदराच्या माध्यमातून पाकिस्तानला बाजूला ठेवून मध्य आशिया तसेच अफगानिस्तानसोबत थेट व्यापार करण्याचं भारताचं स्वप्न आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासासाठी भारताकडून सातत्याने गुंतवणूक सुरू होती. मात्र आता अमेरिकेकडून हे बंदर उद्ध्वस्त करण्यात आल्यामुळे भारताच्या स्वप्नांना सुरूंग लागला आहे.

पाकिस्तान, चीनला फायदा

अमेरिकेनं चाबहार बंदरावर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि चीनला थेट फायदा होणार आहे, चाबहार बंदर उद्ध्वस्त झालं तर चीनचा इराणवर चांगला प्रभाव असल्यामुळे या भागात चीनला आपले हात पाय पसरवता येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ही घटना भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. तसेच चाबहार बंदर जर यशस्वी झालं तर पाकिस्तानच्या ग्वादर बंदराचं महत्त्व कमी होणार आहे. चीनने पाकिस्तानात हे बंदर विकसीत केलं आहे. ग्वादर बंदर आणि चाबहार यांच्यामध्ये अवघं 170 किलोमीटरचं अतंर आहे. मात्र आता अमेरिकेनंक केलेल्या हल्ल्यामुळे त्याचा थेट फायदा चीन आणि पाकिस्तानला होताना दिसत आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in