• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Don 3 Controversy : ‘डॉन 3’चा वाद पुन्हा पेटला; आता रणवीर सिंहच्या वडिलांची एंट्री; उचललं मोठं पाऊल

August 21, 2026 by admin Leave a Comment


Don 3 Controversy : अभिनेता-दिग्दर्शक परहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात ‘डॉन 3’ चित्रपटावरून बिनसंल, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. रणवीरने हा चित्रपट सोडल्यानंतर फरहानच्या कंपनीने नुकसानभरपाई म्हणून त्याच्याकडून 45 कोटी रुपयांची मागणी केली होती. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीरने चित्रपट सोडला, असा आरोप फरहानतर्फे करण्यात आला होता. प्री-प्रॉडक्शनवर बराच खर्च झाला, त्यामुळे आम्हाला नुकसानभरापी मिळावी अशी मागणी त्याने केली. मात्र पाहता पाहता हे प्रकरण चांगलंच पेटलं, वाद वाढतच गेला आणि हे प्रकरण फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) पर्यंत पोहोचलं. आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय, कारण या वादात रणवीर सिंहचे वडील जगजीत सिंह भवनानी यांची एंट्री झाली आहे.

मंगळवारी जगजीत सिंह भवनानी हे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स एसोसिएशन (IMPPA) च्या ऑफीसमध्ये पोहोचले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यांनी IMPPA मध्ये एक्सेल एंटरटेनमेंटतर्फे करण्यात आलेल्या 45 कोटी रुपयांचया मागणीविरोधात अर्ज दाखल केला आहे. तसेच, या असोसिएशनची कायदेशीर टीम आधी या प्रकरणाची चौकशी करेल आणि त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, असं सांगण्यात येत आहे.

‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीरने घेतला निर्णय

खरंतर 2023 साली ‘डॉन 3’ चित्रपटाची घोषणा झाली होती, मात्र तेव्हा काम सुरू झालां नव्हतं, त्याला उशीर झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार अशा चर्चा होत्या. मात्र, ‘धुरंधर’ चित्रपटाला मिळालेल्या तूफान यशानंतर रणवीर सिंहने ‘डॉन 3’मधून माघार घेतली. यामुळे फरहान अख्तरच्या कंपनीला आर्थिक नुकसान झालं, असं सांगण्यात आलं.

रणवीर सिंहवर बंदी

गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण बरंच चर्चेत होतं. फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने रणवीर सिंहविरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह (NCD) जारी केलं होतं. याच आर्थ असा की, या फेडरेशनचा कोणताही सदस्य रणवीरसोबत काम करू शकत नव्हता. त्यामुळे या निर्णयाकडे (रणवीरवर) एकप्रकारची बंदी या दृष्टीने पाहिलं जात होतं. त्याच मुद्यावरून मोठा वादही निर्माण झाला. मात्र, नंतर फेडरेशनने हा निर्णय मागे घेतला. आता रणवीरच्या वडिलांची यात एंट्री झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

कामाबद्दल सांगायचं झालं तर रणवीर सिंह सध्या ‘प्रलय’ या आगामी झॉम्बी थ्रिलर चित्रपटामध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत याचं शूटिंग सुरू झालं. .या चित्रपटात रणवीरसोबत कल्याणी प्रियदर्शन ही झळकणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in