• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Devkhel 2: प्राजक्ता माळीचा असा अवतार कधी पाहिलाच नसेल; ‘देवखेळ 2’चा अंगावर काटा आणणारा टीझर

August 18, 2026 by admin Leave a Comment


कोकणातल्या शंकासूर प्रथेवरून काल्पनिक कथा रचत ‘देवखेळ’ ही वेब सीरिज फेब्रुवारी 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजचा आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘देवखेळ 2’चा थरारक टीझर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्याच झलकने कथेविषयीची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी एका वेगळ्याच आणि गूढ अंदाजात दिसत आहे. त्यामुळे ‘देवखेळ’च्या दुसऱ्या भागात नेमकं काय पहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

प्राजक्ता माळीचा थरारक अवतार

‘देवखेळ 2’च्या टीझरची सुरुवातच गूढता निर्माण करणारी आहे. आजूबाजूला असलेलं भयावह वातावरण, रहस्यमय प्रसंग आणि पात्रांच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता यांमुळे काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची जाणीव होते. या टीझरमध्ये कथेबाबत फार काही उघड केलं नाही, परंतु तरीही सीरिजची कथा अधिक गडद आणि थरारक दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळतात. प्राजक्ता माळीचा लूक हा टीझरचा सर्वांत लक्षवेधी भाग ठरतो. आतापर्यंत प्रेक्षकांनी तिच्या विविध भूमिका पाहिल्या आहेत, मात्र ‘देवखेळ 2’मध्ये ती ज्याप्रकारे दिसत आहे, तो तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच वेगळा अनुभव असणार आहे.

‘देवखेळ’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी कथा अधिक रहस्यमय, भयावह आणि थरारक करण्याचा प्रयत्न असल्याचं या टीझरवरून जाणवतं. भीती, गूढता आणि अनपेक्षित वळणं यांचा मेळ या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

पहा टीझर-

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

नवा मर्डर नवं रहस्य

‘जेव्हा मी देवखेळ वाचत होती, तेव्हाच मला समजलं होतं की दुसरा भाग येणार आहे. हा दुसरा भाग पहिल्यापेक्षाही अधिक रंजक असेल हेसुद्धा मला माहीत होतं, खासकरून सारिका म्हणून.. आणि पहा त्याची झलक. देवखेळला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार. घेऊन येत आहोत ‘देवखेळ 2′. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होणार, नवा मर्डर नवं रहस्य घेऊन येणार’, असं कॅप्शन देत प्राजक्ता माळीने हा टीझर शेअर केला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर प्राजक्ताच्या व्यक्तिरेखेभोवती नेमकं कोणतं गूढ दडलंय, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

देवखेळच्या पहिल्या भागावर कोकणातल्या स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर हा वाद विधानसभेतही पोहोचला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे या पौराणिक आणि खूप जुन्या हिंदू लोककलेचं या सीरिजमध्ये विपरित चित्रण केल्याचं आणि लोककलेतील शंकासूर या दैवताचं अपमानकारक चित्रण केल्याचं कोकणातल्या नागरिकांचं म्हणणं होतं. यामुळेच या वेब सीरिजला कोकणातून तीव्र विरोध करण्यात आला होता.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in