• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dawood Ibrahim : दाऊदचा खास झिंगाडा, एक ISI एजंट आणि..या चौघांवर सोपवलेली देश हादरवण्याची जबाबदारी, मुंबईत तर हे लोक..

June 4, 2026 by admin Leave a Comment


देशाची राजधानी दिल्लीला हादरवण्याचं एक मोठं कारस्थान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावलं आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI, पाकिस्तान आणि दुबईत सक्रीय असलेलं अंडरवर्ल्ड आणि भारतातील त्यांचे प्यादे हे मिळून भारतातील वेगवेगळ्या शहरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत होते. त्यांच्या रडारवर फक्त सर्वसामान्य नाही, तर सुरक्षा संस्था, पोलीस आणि देशातील महत्वाच्या सरकारी संस्था सुद्धा होत्या. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका दीर्घ ऑपरेशननंतर हे सर्व नेटवर्क मोडून काढलं. या कारवाईत देशाच्या वेगवेगळ्या भागातून 8 आरोपींना अटक करण्यात आली. यात उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब आणि नेपाळचे लोक होते.

वेळेतच हे दहशतवादी पकडले गेले म्हणून अन्यथा दिल्ली, मुंबई, पंजाब आणि चंदीगड सारख्या शहरात मोठे दहशतवादी हल्ले झाले असते, असा पोलिसांचा दावा आहे. या संपूर्ण मॉड्युलमध्ये पाकिस्तान आणि दुबईत बसलेले हँडलर सर्व ऑपरेट करत होते असं तपासात समोर आलय. यात प्रमुख नाव अमीर भट्ट, शाहजाद भट्टी, मुन्ना झिंगाडा आणि यावर खान यांचं आहे. हे लोक सोशल मीडिया, एन्क्रिप्टेड Apps आणि दुसऱ्या डिजिटल माध्यमातून भारतातील युवा आणि गुन्हेगारांशी संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. मुन्ना झिंगाडा हा दाऊद गँगसाठी काम करतो.

भरतीची पद्धत खूप खतरनाक होती

यांची पद्धत खूप खतरनाक होती. ज्या युवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, पैशासाठी ते काहीही करायला लगेच तयार होतील अशा मुलांचा शोध घेतला जायचा. त्यांना छोटी-छोटी काम देऊन नेटवर्कशी जोडलं जायचं. त्यांच्यावर विश्वास बसल्यानंतर त्यांना शस्त्र, पैसा आणि टार्गेट दिलं जायचं. स्पेशल सेलने शाहजाद भट्टीशी संबंधित नेटवर्कच्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं होतं. पाकिस्तान आणि दुबईत बसलेले लोक नवीन भरती करतायत अशी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. टेक्निकल टेहळणी, मोबाइल सर्विलान्स, सोशल मीडियावरील हालचाली आणि मानवी स्त्रोताच्या माध्यमातून मिळालेली माहिती एकत्र करुन पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

मुंबई कनेक्शन कसं समोर आलं?

चौकशी दरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून 23 वर्षांच्या विजयला अटक केली. विजय दुबई आणि पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होता. 14 मे रोजी पुणे स्पेशल सेलने त्याला अटक केली. विजयची अटक टर्निंग पॉइंट ठरली. विजयच्या चौकशीतून झारखंडच्या नितीश पासवानच नाव समोर आलं. विजय आणि नितीशच्या चौकशीतून तपासाचा फेरा मुंबईपर्यंत पोहोचला.

मुंबईत ग्रेनेड हल्ले आणि फायरिंगची जबाबदारी

27 मे रोजी तौकीर रिजवान अहमद शेख आणि साजिद महबूब शेख उर्फ अरबाज खानला पोलिसांनी अटक केली. दोघे ISI चे हँडलर यावर खान आणि मुन्ना झिंगाडाच्या संपर्कात होते. त्यांनी मुंबईत राहणाऱ्या हुजैफा नावाच्या व्यक्तीची भरती केली होती. मुंबई पोलिसांनी हुजैफाला पकडलं. तौकीर आणि अरबाजला दिल्ली आणि मुंबईत ग्रेनेड हल्ले आणि फायरिंगची जबाबदारी दिली होती. त्यांना संभाव्य टार्गेटची रेकी करणं आणि योग्य वेळेची वाट पाहण्यास सांगण्यात आलं होतं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 14 वर्षांनंतर सीक्वेल; पुन्हा लव्ह ट्रँगल हिट, 5 दिवसांत गाठला कमाईचा जादुई आकडा
  • NCERT च्या पुस्तकावरून ‘आणीबाणी’; इयत्ता 9 वीच्या पुस्तकात Emergency वर धडा, देशभरात वादाची शाळा
  • Mumbai Local shocker : लोकलमध्ये मयंकवर का केले वार ? पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपी रोशनचा थरकाप उडवणारा खुलासा
  • Ghabadkund : ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेविश्वात ‘अच्छे दिन’, ‘घबाडकुंड’ची 5 दिवसांत बक्कळ कमाई
  • MNS On Rahul narvekar : ‘जर फॉन्ट छोटा होता तर,मग..’ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या स्पष्टीकरणावर मनसेचा थेट सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in