
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात भरदिवसा घडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर तिघा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकला. या घटनेत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही दरोडेखोर हातात बंदूक आणि इतर शस्त्रे घेऊन दुकानात घुसले. दुकानातील कर्मचाऱ्यांना धमकावत त्यांनी काही मिनिटांतच सोन्याचे दागिने लुटले आणि तेथून पलायन केले. संपूर्ण घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या भरदिवसा घडलेल्या दरोड्यामुळे डहाणूसह संपूर्ण परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून, CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply