
चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला आहे. चेन्नईने मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान एकतर्फी फरकाने सहज पूर्ण केलं. चेन्नईने 11 बॉलआधी आव्हान पूर्ण केलं. चेन्नईने 18.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. चेन्नईचा हा या मोसमातील चौथा आणि मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला.
Leave a Reply