
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे येथील कार्यक्रमाची समर्थकांकडून जय्य्त तायारी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे या कार्यक्रमाआधीच ,पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) झालेल्या संघर्षानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.
सीओईपीच्या एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा वाद उघडकीस आला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारत आहे. यांनंतर ती म्हणते “२० ऑगस्ट रोजी जेव्हा एनएसयूआय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते, तेव्हा आम्हाला बळजबरीने कॉलेजवर आरोप कण्याचे सांगण्यात आले. “पण खरं तर आमची दिशाभूल करण्यात आली आणि दबाव निर्माण करण्यात आला,” ज्यामुळे मी तसे म्हणाले….. हे चुकीचे होते. म्हणून मी कॉलेजची माफी मागते,” असे ती विद्यार्थिनी व्हिडिओमध्ये म्हणते.
Leave a Reply