• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Shivakumar : काँग्रेसचा जबरदस्त गेम, शिवकुमारना मुख्यमंत्री बनवलं पण पूर्ण स्वातंत्र्य नाही मिळणार अशी सुद्धा फिल्डिंग लावली

June 4, 2026 by admin Leave a Comment


काँग्रेसने नुकताच कर्नाटकमध्ये नेतृत्व बदल केला. तीन वर्षानंतर अखेर डीके शिवकुमार यांना कर्नाटकच मुख्यमंत्रीपद मिळालं. सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री पदावरुन दूर करताना हे सर्वसहमतीने होतय हे काँग्रेसने दाखवलं. नेतृत्व बदल करताना पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही याची काळजी घेतली. डीके शिवकुमार यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिलं असलं तरी पूर्ण स्वातंत्र्य मात्र दिलं नसल्याचं दिसत आहे. पतंग भले, शिवकुमार यांच्या हातात असली, तरी दोर मात्र काँग्रेस हायकमांडकडे असल्याचं दिसतं. अलीकडच्या काही निर्णयांवरुन हे दिसतय. सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवलं असलं तरी काँग्रेसच्या निर्णयात त्यांची छाप दिसून येतेय. शिवकुमार यांच्या शपथविधी नंतर काँग्रेसने कर्नाटक विधान परिषदेचे चार उमेदवार आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली.

विधान परिषदेच्या चार उमेदवारांपैकी कमकनूर हे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या पसंतीचा उमेदवार आहे. पीवी मोहन संघनट सरचिटणीस वेणूगोपाल यांची पसंत आणि शिवन्ना मालवल्ली माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या पसंतीचा उमेदवार आहे. बीके हरिप्रसाद यांना पुन्हा एकदा विधान परिषदेचा उमेदवार बनवलं आहे. कारण त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हरिप्रसाद यांची कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ही खास बाब आहे. कारण ते डीके शिवकुमार यांचे विरोधक मानले जातात. काँग्रेसने हा निर्णय घेऊन प्रदेश संघटना पूर्णपणे शिवकुमार यांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही, तसचं त्यांना पूर्णपणे मोकळीक, स्वातंत्र्य मिळणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

सिद्धारमैया यांच्या मर्जीने कुठले निर्णय झाले?

ओबीसी समाजातून येणारे हरिप्रसाद 71 वर्षांचे आहेत. ते चार दशकापासून काँग्रेसचे दिल्लीच्या मर्जीतले नेते समजले जातात. हायकमांडचे ते निकटवर्तीय आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात सिद्धारमैया आणि प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची महत्वाची भूमिका मानली जाते. हरिप्रसाद हरियाणा काँग्रेस प्रभारी सुद्धा होते. डीके शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात दलित नेता जी परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनवण्यातही सिद्धारमैया यांनी महत्वाची भूमिका बजावली. सिद्धारमैया यांनी एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी आग्रह धरला होता. पण शिवकुमार यांना आपल्या मंत्रिमंडळात एकही उपमुख्यमंत्री नको होता. अखेर सिनयोरिटी आणि दलित मतपेटी लक्षात घेऊन जी परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनवलं.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in