• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Fadnavis On Sharad Pawar | पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले पवार साहेबांनी…

May 20, 2026 by admin Leave a Comment


राजकारणात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पवारांच्या वक्तव्याला महत्त्वपूर्ण म्हटलं आहे.
मुंबईत आयोजित ‘महाटेक CSR कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध CSR प्रकल्पांबाबत माहिती दिली. “महाराष्ट्रात सर्वाधिक CSR निधी येतो, मात्र तो प्रामुख्याने मुंबई आणि पुणे विभागात खर्च होतो. आता गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात CSR उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं केलेलं कौतुक यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “पवार साहेबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. अनेक जण पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करत होते. मात्र या दौऱ्यात झालेल्या रणनीतिक करारांमुळे पुढील 10 ते 20 वर्षांसाठी देशाचं भवितव्य सुरक्षित होणार आहे. त्यामुळे विनाकारण टीका करू नये, पंतप्रधान देशहितासाठी काम करत आहेत,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बँकेपेक्षा जास्त कमाई! जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी, पाहा लेटेस्ट व्याजदरांची यादी
  • ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन
  • ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in