
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल दिल्लीत मोठं आंदोलन झालं. तरुणाई मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. काल या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. रात्री पुन्हा एकदा आंदोलक जंतर मंतरवर परतले. दिल्लीत मुसळधार पाऊस कोसळला. आंदोलकांना पांगवण्यासाठी वीज पुरवठा सुद्धा खंडीत करण्यात आला होता. पण आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांनी मैदान सोडलं नाही. सकाळी पाचच्या सुमारासही सीजेपीच्या कार्यकर्त्यांच आंदोलन हे जंतर-मंतर परिसरात सुरुच आहे. काल रात्रीपासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे तरी देखील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं आहे.
सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून जंतर-मंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याठिकाणी काल रात्रीपासून पाऊस पडत असल्यामुळे चिखल झाला होता आणि घाण या परिसरात जमा झाली होती. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply