• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!

July 20, 2026 by admin Leave a Comment


Delhi Jantar Mantar Protest : सध्या दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू आहे. सीजेपीने आज संसद मार्च काढला जाणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. या आंदोलनात देशभरातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर आता दिल्लीमध्ये हजारो आंदोलकांनी संसदेकडे कूच केले आहे. तर आंदोलकांना रोखण्यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय. काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. असे असतानाच आता सीजीपीचे प्रतिनिधी आणि केंद्रात मंत्री असलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे आता समोर आले आहे.

सौरभ दास आणि आशुतोष रांका नड्डा यांच्या भेटीला

पोलिसांनी संपूर्ण दिल्लीमध्ये कलम 163 लागू केले आहे. दिल्लीमधील राजीव चौक तसेच इतर पाच मेट्रो स्टेशनवरील प्रवेशद्वार तसेच बाहेर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही संसदेकडे कूच करणारच, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे. सीजेपीचे शिष्टमंडळ तसेच जे पी नड्डा यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली आहे.
या बैठकीनंतर सौरभ दास यांनी आपल्या सोशल मीडियावर बैठकीत काय झालं, याविषयी माहिती दिली. दोन महिने वाट पाहून जे पी नड्डा यांच्याशी फक्त दहा मिनिटेच भेट होऊ शकली, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. तसेच
आम्ही आमच्या मागण्यांचे लिखीत पत्र त्यांना दिले आहे. आम्ही अंतर्गत या मागण्यांवर चर्चा करू, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्येचेही त्यांनी सांगितले.

नेमक्या मागण्या काय?

तसेच, सोनम वांगचूक यांची लवकरात लवकर सुटका करावी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षेमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्याही सीजेपीने केल्या आहेत. आता सरकार यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in