• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Abhijeet Dipke : आता पुन्हा नवं तुफान, अभिजीत दीपकेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा, म्हणाले निवडणूक आल्यावर आम्ही…

August 1, 2026 by admin Leave a Comment


Abhijeet Dipke : अभिजित दीपके यांचे दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे. नीट घोटाळ्यामुळे सुरू झालेले कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता दीपके आपल्या छत्रपती संभाजीगरातील घरी पोहोचले आहेत. त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली असून ते उपचार घेत आहेत. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. तसेच भविष्यात कॉकरोच जनता पार्टीची वाटचाल कशी असेल, याचेही त्यांनी उत्तर दिलं आहे. सीजेपीचे हे आंदोलन संपले आहे का? भविष्यात कॉकरोच कोणत्या मुद्द्यावर लढा देणारे, याचेही उत्तर दीपके यांनी दिले आहे.

टुथब्रशच्या किमतीही सरकारच ठरवतं

तुमचे आंदोलन आता संपले आहे का, भविष्यात कोणत्या मुद्द्यावर लढणार? असा प्रश्न दीपके यांना करण्यात आला. यावर बोलताना. आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल. त्या शिवाय आपण राहू शकत नाही. आपण गाडीत पेट्रोल टाकतो. पेट्रोलच्या किमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किमतीही सरकारच ठरवतं. जे म्हणतात माझा राजकारणाशी संबंध नाही,त्यांना सांगतो तुम्ही ए पॉलिटिकल नाही. तुम्ही इग्नोरंट आहे. मी राजकीय आहे. मी क्लिअरली सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या वेळी राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा ऑप्शन घेतला आहे, असे दीपके यांनी सांगून टाकले.

निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ

आमचा पॉलिटिकल स्टँड हा सरकारच्या बाजूने नसेल आणि विरोधकांच्या विरोधात नसेल. लोकशाही बळकट करण्यावर असेल. मला जेनजीला सांगायची गरज नाही. कुणाला मतदान करावं किंवा करू नये हे तेच ठरवतील. जेनजीला काही कळत नाही असं समजू नये. ते स्मार्ट आहे. निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ. सरकारने चुकीचं काही केलं तर आम्ही त्यांच्याविरोधात बोलू. पण मतदान कुणाला करावं हे आम्ही सांगणार नाही, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in