• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ChatGPT ला मुलीबद्दल विचारला असा प्रश्न, काही मिनिटांमध्येच पोलीस थेट तरुणाच्या घरी

August 20, 2026 by admin Leave a Comment


आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ChatGPT चा वापर सुरू आहे. अनेक लोक असे आहेत, जे की त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते ChatGPT च्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करतात. अगदी ऑफिसमधील कामापासून ते रिलेशनशीप सल्ल्यांपर्यंत लोक आजकाल चॅटजीटीपीची मदत घेतना दिसून येत आहेत, ते चॅटजीपीटीला प्रश्न विचारत असतात. काही जण तर असेही आहेत, जे की खूप विचित्र प्रकारचे प्रश्न चॅटजीपीटीला विचारतात, आणि त्यामुळे मग त्यांच्या अडचणी देखील वाढतात. असाच एक प्रकार एका 25 वर्षीय तरुणासोबत घडला आहे. ChatGPT ला प्रश्न विचारणं या तरुणाच्या एवढं अंगलट आलं की, प्रश्न विचारल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये पोलीस या तरुणाच्या घरी येऊन धडकले.

ही घटना फ्लोरिडामध्ये घडली आहे. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका तरुणाने एका गुन्ह्यासाठी चॅटजीपीटीकडे डिटेल्स प्लानची मागणी केली होती. या तरुणाचं ब्रेकअप झालं होतं, त्यामुळे तो प्रचंड चिडलेला होता, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडवर अत्याचार करून तिची हत्या करायची होती. त्या संदर्भात त्याने चॅटजीपीटीची मदत घेण्याचं ठरवलं आणि त्याने चॅटजीपीटीकडे या गुन्ह्याच्या परफेक्ट प्लानिंगसाठी मदत मागितली, परंतु ChatGPT यंत्रणेने सतर्कता दाखवत याची माहिती थेट अमेरिकन तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयला दिली.

एफबीयाला या संदर्भात माहिती होताच पुढील अवघ्या काही सेंकदांमध्ये पोलीस या तरुणाच्या घरी येऊन धडकले, या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून, आता या संदर्भात त्याची चौकशी सुरू आहे. हा तरुण गेल्या मार्च महिन्यापासून चॅटजीपीटीचा वापर करत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे, तसेच पोलिसांकडून आता गेल्या दोन महिन्यांमध्ये या तरुणाने चॅटजीपीटीला काय-काय प्रश्न विचारले? त्याची देखील माहिती काढणं सुरू आहे.

अनेकजण चॅटजीपीटीला एखाद्या विषयातील तज्ज्ञ मानतात, मात्र चॅटजीपीटी ही तुमची मदत करू शकते, मात्र त्या माहितीवर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील एक प्रश्नच आहे, अनेकजण तर आजारपणात देखील चॅटजीपीटीच्या सल्ल्यानेच स्वत:वर उपचार करतात, मात्र ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in