• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : समाजात तुम्हाला मान हवा आहे? मग या गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

August 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या समाजात दोन प्रकारचे लोक असतात, काही लोकांना आपल्या आयुष्यात प्रचंड मान-सन्मान मिळतो, लोक त्यांचा आदर करतात. लोक कायम अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे असतात. परंतु त्याचसोबत समाजात असे देखील काही लोक असतात, ज्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच मान-सन्मान मिळत नाही. अशा लोकांचा समाज कधीही आदर करत नाही, तसेच अशा लोकांची लवकर कोणी मदत देखील करत नाही. असं का होतं? तर तुमच्याकडे असलेल्या गुणांमुळे हे सर्व घडतं. त्यामुळे माणसाने नेहमी चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

आत्मसन्मान – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीने आपला आत्मसन्मान जपलाच पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या स्वत:विषयी आदर नसेल तर दुसरे लोक तुमचा कधीही आदर करणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला समजात सन्माने जगायचे असेल तर तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपलाच पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

दिलेला शब्द पाळा – चाणक्य म्हणतात मानसाने काहीही करावं पण दिलेला शब्द पाळावा, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखादा शब्द दिला आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण तुम्ही तुमचं आश्वासन हे पूर्ण केलंच पाहिजे, जेव्हा तुम्ही तुमचं आश्वासन पूर्ण करता, तेव्हा तुमच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो, आणि ते तुमचा आदर करू लागतात. समजामध्ये तुमचा आदर वाढतो

वेळ पाळा – चाणक्य म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाने नेहमी वक्तशीर असावं, जो व्यक्ती दिलेला शब्द आणि वेळ पाळतो, समाज त्याचा आदर करतो. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखादी वेळ दिली असेल तर ती वेळ पाळा, कधीही चुकवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in