
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्य जगताना माणसाने नेहमी काळजी घेतली पाहिजे, तुमचं एक पाऊल जरी चुकीचं पडलं, तर तुमचं अख्ख आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. समजात अशी काही माणसं असतात, ज्यांची संगत कधीही करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
व्यसनी मित्र – चाणक्य म्हणतात जर तुमचे मित्र हे व्यसनी असतील, तर त्यांची संगत आजच सोडा कारण चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. मात्र वाईट सवयी लगेच लागतात. जर तुमचा मित्र दारू पित असेल तर ती सवय तुम्हाला देखील लागू शकते, व्यसनामुळे संसाराचं वाटोळ होतं, आयुष्य उद्ध्वस्त होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
जुगार – चाणक्य म्हणतात जे लोक जुगारी असतात, अशा लोकांची संगत कधीच करू नका, कारण हे लोक खूप अविचारी असतात. ते जुगारासाठी आपलं घरदार देखील पणाला लावू शकतात. जर तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
परस्त्री – चाणक्य म्हणतात माणसाने आपल्या जीवनसाथीसोबत नेहमी एकनिष्ठ असावं, त्यामुळे घरात वाद होत नाहीत, अन्यथा संसाराचं वाटोळ होऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत एकनिष्ठ असाल तर तुमचा संसार सुखाचा होतो, असं चाणक्य म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply