• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या चार ठिकाणी दान केल्यास मिळेल पुण्य, आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही

August 15, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील तुम्हाला मार्गदर्शन करतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. तसेच चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये दान कुठे करावं? आणि कुठे करू नये, दान केल्याचे काय फायदे आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही दिलेल्या पैशांचा कोणत्या तरी एखाद्या वाईट कामासाठी उपयोग होऊ शकतो, अशा ठिकाणी चुकूनही दान करू नये, कारण अप्रत्यक्षपणे तुम्ही देखील त्या पापामध्ये सहभागी होत असतात. तसेच जिथे तुम्हाला वाटतं तुमचा पैसा सत्कारनी लागेल तिथे दान करावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य यांनी असे चार ठिकाणं सांगितले आहेत, जिथे दान हे केलंच पाहिजे, असं चाणक्य सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

समाजसेवेसाठी पैशांचा वापर करा – चाणक्य म्हणतात जिथे समाजासाठी फायद्याची कामं होतात, अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या ताकदीप्रमाणे दान हे केलंच पाहिजे. समाजसेवेसाठी आपल्या जवळचा पैसा हा वापरला पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुण्य तर मिळतंच परंतु त्याचबरोबर तुमचा मान-सन्मान देखील वाढतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी – चाणक्य म्हणतात मुलांना चांगलं शिक्षण मिळून देणं, हे प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने पैसा खर्च केला पाहिजे, त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीच पाहिजे.

आजारी लोकांना मदत करा – चाणक्य म्हणतात आज आपल्या समजात असे अनेक लोकं आहेत, त्यांना एखादा आजार आहे. परंतु उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे, त्यामुळे अशा व्यक्तीच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो.

गरजू लोकांना मदत करा – चाणक्य म्हणतात या समजात असे अनेक गरजू लोक आहेत, त्यांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे, यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट कधीही कमी पडणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in