• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यात श्रीमंत व्हायचंय, मग चाणक्यांच्या या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, पाण्यासारखा पैसा कमवाल

June 8, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्याचबरोबर ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये एखादा माणूस कशापद्धतीने पैशांचं उत्तम नियोजन करून श्रीमंत बनू शकतो, याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जेवढं महत्त्व पैशांना आहे, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही गोष्टीला नाहीये. माणसाच्या आयुष्यात पैसाच सर्व काही नाही, ही गोष्टी जरी खरी असली तरी देखील प्रत्येकासाठी पैसा हा खूप महत्त्वाच असतो. कारण माणसाला कोणत्याही प्रकारच्या संकटातून सोडवण्याची ताकद ही पैशांमध्ये असते. माणसावर जी काही त्याच्या आयुष्यात संकटं येतात त्यातील जवळपास 90 टक्के संकट ही पैशांमुळेच निर्माण झालेली असतात, त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात बचत ही केलीच पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

मोठेपणा दाखवू नका – चाणक्य म्हणतात असे अनेक लोक या समाजात असतात, त्यांच्या हातात पैसा आला की ते लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी पैसे खर्च करतात. त्यांचा सर्व पैसा असाच अनावश्यक कारणांसाठी खर्च होतो. परिणामी घरात गरिबी येते. त्यामुळे आपल्या हातात जो पैसा आहे, तो मानसाने नेहमी जपून वापरावा. आपल्याला गरजेच्या कोणत्या वस्तू आहेत? ते आधी लक्षात घ्यावं आणि त्यावरच पैसा खर्च करावा. माणूस हा जीवन आरामादायी जगण्यासाठीच पैसा कमावत असतो, त्याने तो खर्च देखील केला पाहिजे, परंतु सोबतच बचत देखील करावी असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे.

कष्ट करा – चाणक्य म्हणतात या जगात कोणाला काहीही फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कष्टच करावे लागतात. त्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर कष्ट करा. तुम्ही जर इतरांच्या संपत्तीवर नजर ठेवली आणि ती फसवणूक करून मिळवली देखील तरी अशी संपत्ती तुमच्या हातात फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. हे कष्ट देखील योग्य दिशेनं व्हायला हवेत. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पैशांचा आदर करा – चाणक्य् म्हणतात मानसाने नेहमी नम्र असलं पाहिजे. तुम्ही जे कमावता त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे. अनेक लोक असे असतात ते पैशांची उधळपट्टी करतात. जे लोक पैशांची उधळपट्टी करतात, त्यांच्या हातात कधीही पैसा टिकत नाही. त्यामुळे तुम्ही पैशांचा आदर केला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही जो पैसा कमवता त्याची गुंतवणूक देखील योग्य ठिकाणी करावी, माणसाने आयुष्यात काही पैसा हा दान,धर्मासाठी देखील खर्च करावा असा, सल्ला देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in