• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचंय? मग चणक्यांच्या या चार गोष्टी ऐकाच

June 28, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ, आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आयुष्य कसं जगावं याचा एक नवा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाला कधीही असं सहजासहजी यश मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात, कष्टात सातत्य ठेवावं लागतं तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. आयुष्यात नुसते कष्ट करूनच चालत नाहीत, तर त्या कष्टाची दिशा देखील योग्य लागते, जर तुम्ही करत असलेल्या कष्टाची दिशा चुकली तर तुम्हाला यश मिळत नाही, मात्र जर तुम्ही करत असलेल्या कष्टाची दिशा योग्य असेल तर तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहचतात. अशा काही गोष्टी असतात ज्या माणसाला आपल्या आयुष्यात यशस्वी बनवतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कष्टाची तयारी ठेवा – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाची तयारी ठेवा, कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल, तेवढं लवकर तुम्हाला यश मिळेल त्यामुळे आळस झटकू कामाला लागा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

अडचणींवर मात करा – चाणक्य म्हणतात आयुष्य जगत असताना अडथळे येतच असतात, परंतु या अडथळ्यांना कधीही घाबरून जाऊ नका, अडचणींवर मात करा, तुम्हाला नक्की यशाचा मार्ग सापडेल, तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल.

सत्य बोलत रहा – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही होऊ द्या, इकडचं जग तिकडं होऊ द्या, परंतु तुम्ही कधीही सत्याची साथ सोडू नका. नेहमी सत्याची बाजू घ्या, जो व्यक्ती सत्याची बाजू घेतो, त्याचा आयुष्यात कधीही पराभव होत नाही.

संयम – चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टीमध्ये संयम गरजेचा असतो. जर तुमच्याकडे संयम नसेल तर तुम्ही अडचणीत सापडाल, परंतु जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही मात्र जग जिंकाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार, 30 जून पर्यंत पटापट उरकून घ्या ही कामं
  • TET पेपरफुटी प्रकरणात युवक काँग्रेसचे मुंबईत आंदोलन, दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर घोषणाबाजी
  • AUSW vs INDW : कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार?
  • आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण; चाणक्य नीतीमधील गुप्त सल्ला वाचाच!
  • IND vs IRE: टीम इंडियावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटकांचा खेळ झाला आणि पावसाची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in