शेंगदाणे खाताना घशात शेंगदाणा अडकल्याने एका चार वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही छोटीशी मुलगी शेंगदाणे खात असताना तिच्या श्वास नलिकेत शेंगदाणा अडकल्याने तिला गुदरमल्यासारखे झाला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील रुनी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चार वर्षांची […]
india
Mumbai Local Megablock : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक, लोकल सेवा पूर्णपणे बंद, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रेल्वे […]
एक तांत्रिक अन् तिघांचा खेळ खल्लास… पैशांच्या लोभापोटी भयंकर कांड, त्या रात्री काय घडलं?
भारत 21 शतकात विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र देशात अजूनही अंधश्रद्धा कायम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशातच आता छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तांत्रिकाच्या नादाला लागून काळी जादू आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली तीन व्यावसायिकांचा मृत्यू झाला आहे. या तिघांना पैशांचा पाऊस पडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पाच लाख रूपये एका रात्रीत अडीच कोटी रुपये […]
Pune Land Scam: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही? दादांचा उलट सवाल
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी विधानसभेत पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहारावरून आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये या प्रकरणासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. अजित पवारांच्या मते, अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून चुकीच्या बाबी समोर आल्यास तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते, ज्यामुळे पुढील प्रकार घडला नसता. ते म्हणाले […]
महिलेच्या स्वप्नात साप येताच अख्खं गाव हादरायचं, बरोबर 2 दिवसांनी घडायची महाभयंकर घटना, तब्बल 14 वेळा..
काही अशा घटना घडत असतात ज्यावर विश्वास देखील ठेवला जाऊ शकत नाही, मात्र अशा घटना वास्तवात घडलेल्या असतात. अशीच एक घटना झाशी जिल्ह्यातल्या चिरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पट्टी कुमर्रा गावामध्ये घडली आहे. ज्या व्यक्तीसोबत हे सर्व घडलं आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाहीये. सीताराम अहिरवार असं या 75 वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना […]
Ajit Pawar PhD Funding Row: 42 हजार रुपये मिळतात म्हणून पीएचडी? अजित पवारांचे पीएचडी शिष्यवृत्तीवरील वक्तव्य वादात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी शिष्यवृत्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. “42 हजार रुपये मिळतात म्हणून एकाच कुटुंबातील पाच-पाच जण पीएचडी करतात,” असे विधान अजित पवारांनी केले आहे. यासोबतच, बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) आणि सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था) या संस्थांमार्फत पीएचडी करणाऱ्या […]