ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कुणालने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशातच आता कुणालच्या मित्रांनी त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. क्लासमध्ये त्याची वर्तणूक कशी असायची […]
india
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी: संभाजीनगरमधील सांगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर मृत कुणाल सांगुडेंच्या मावशी पल्लवी पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य माहिती नसताना कुणाल आणि आमच्या कुटुंबाविषयी खोट्या अफवा पसरवू नका,” अशी त्यांनी विनंती केली. पल्लवी पाटील म्हणाल्या, संगीता सांगुडे या त्यांच्या मोठ्या बहिणी, कुणाल हा भाचा आणि मुरलीधर सांगुडे […]
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
पुणे | प्रतिनिधी: चाकण MIDC मधील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी चाकण–तळेगाव रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून केवळ डागडुजी न करता […]
ताजमहालपेक्षा सुंदर, शेतकऱ्याने पत्नीच्या मृत्यूनंतर शेतात…, 17 वर्षानंतर फोटो पाहून सर्वच झाले थक्क
खरं आणि निस्वार्थ प्रेम काळाच्या ओघात संपत नाही, ते आठवणींच्या रूपाने जिवंत राहतं. इंग्लंडमधील साउथ ग्लॉस्टरशायर परिसरातील शेतकरी विन्स्टन हॉवेस यांची कहाणी याचं सुंदर उदाहरण आहे. पत्नीच्या निधनानंतर तिच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी तब्बल 6 हजार ओकची झाडं लावून हृदयाच्या आकाराचं जंगल उभं केलं. विन्स्टन आणि त्यांची पत्नी जेनेट यांचं 1962 मध्ये लग्न झालं होतं. तब्बल […]
अखेर मुहूर्त ठरला? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट, कोअर कमिटीच्या घडामोडींना वेग
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याला अचानक ब्रेक लागला. तर आता नवीन अपडेट समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच […]
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी… 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी एका चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सह सोळा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 2143 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. ही मोठी कारवाई आयकर विभागाने केलेल्या सलग चार दिवसांच्या विस्तृत झाडाझडतीनंतर करण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक आर्थिक अनियमितता समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित […]