पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली असा दावा करण्यात येत होता, या दाव्यामुळे पाकिस्तामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली, ज्या जेलमध्ये इमरान खान यांना ठेवण्यात आलं आहे, त्या जेलबाहेर मोठ्या संख्येनं पीटीआयचे कार्यकर्ते जमा झाले, अखेर दबाव वाढल्यानं […]
india
IND vs SA : केएलची वनडेत कसोटी, कॅप्टन म्हणून कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
टीम इंडिया कसोटी मालिका गमावल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुबमनच्या दुखापतीमुळे केएलला अनेक वर्षांनंतर पुन्हा एखदा नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. […]
Chanakya Neeti : जगातील सर्वात शक्तिमान गोष्ट कोणती? तुम्ही विचारही करू शकणार नाही, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी माणसानं कसं वागावं? आणि कसं वागू नये याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला देताना म्हणतात […]
भाषा सक्तीसाठी होणारी मारणार चुकीची; सुनील शेट्टीने मांडले स्पष्ट मत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेवरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये मोठा वाद सुरु आहे. अनेकदा तर भाषेवरुन झालेला वाद हा मारहाणी पर्यंत पोहोचला आहे. हे प्रसंग आणि त्यातून उफाळलेले राजकारण, यावर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याने स्पष्ट मत मांडले आहे. त्याने भाषासक्तीसाठी होणारी मारणार चुकीची आहे असे म्हटले आहे. काय म्हणाला सुनील शेट्टी? […]
भारतासाठी गुडन्यूज, टॅरिफ दबावात घेतली मोठी झेप, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात. या पैशांचा वापर रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात फंड म्हणून करत आहे, त्यामुळे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम होत नसल्याचा आरोप देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला […]
शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल, व्यापाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिल्याने खळबळ
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच आता शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात अमोल खताळ यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. […]