भारतातील सोन्याची पुढची लाट पारंपरिक दुकानांमधून नव्हे, तर मोबाईल फोनमधून सुरू होऊ शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ‘गोल्डन फ्लाईट 2047’ या नवीन अहवालानुसार, आजच्या ‘जनरेशन झेड’ पिढीकडे घरांमध्ये साठवलेल्या अंदाजे 31,000 टन सोन्याला आधुनिक उपयोगात आणण्याची मोठी संधी आहे. या सोन्याचे मूल्य अंदाजे 315 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, ‘जनरेशन झेड’, म्हणजेच 1997 ते […]
india
Snakes Safety Tips : विषारी साप घरापासून दूर पळतील; 5 झाडे ठरतील फायदेशीर, जाणून घ्या
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बिळातून साप बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे बिळातून बाहेर आलेले साप थेट घरात शिरण्याची भीती असते. काही जण साप पळवण्यासाठी केमिकलयुक्त औषधांचा वापर करतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. तुमच्या घरात ही 5 झाडे लावल्यास साप जवळपासही फिरकणार नाही. यासाठी आजच तुमच्या घराच्या गार्डनमध्ये काही विशेष झाडे लावणे फायदेशीर ठरू शकते. सर्पगंधा […]
शिवसेना कुणाची? थेट डॉ. आंबेडकरांच्या विधानाचा दाखला, कुणाची कोंडी? सुप्रीम कोर्टात काय काय घडतंय?
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ कबिल सिब्बल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना ठाकरे गटाने तीन वर्षांपूर्वी ही आमदार अपात्रते संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ […]
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर… वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्काच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत अनेक महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडले. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा दावा करत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. याबाबत वकील असीम सरोदे यांनी मत […]
अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवून द्या… 5100 रुपये पाठवले, तिन्ही मुली निघाल्या निर्दयी; तडपून तडपून वडील गेले
ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपत येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकले असून, वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील […]
विधिमंडळ स्तरावर शिंदेकडे बहुमत होतं, मात्र… कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
शिवसेना नेमकी कुणाची, याचा फैसला कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होत आहे. दोन्ही गटांकडून आपापली बाजू मांडली जात असून, आजच्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विधिमंडळातील […]