अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आजवर विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त ती इतर व्यवसायातूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. शिल्पाचा 'बॅस्टियन' नावाचा रेस्टॉरंट अनेकांच्या परिचयाचा आहे. तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राने व्यवसायाबद्दल खुलासा केला आहे. राज कुंद्राने खुलासा केला की, शिल्पा आणि तो 'बॅस्टियन'च्या कमाईचा एकही पैसा घरी नेत नाहीत. ते पगार किंवा कमावलेला नफासुद्धा […]
entertainment
Jana Nayagan : ‘जन नायकन’साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपताच चाहत्यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणेच आनंद साजरा केला आहे. ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा दिवस हा जणू एखाद्या सणाप्रमाणेच तमिळनाडूमध्ये साजरा केला जात आहे. संपूर्ण तमिळनाडूत या चित्रपटाविषयी […]
रेखाचे ते सुपरहिट गाणं! 35 वर्षानंतरही लग्नसोहळ्यात वाजते, महिला धरतात ठेका
एखादा लग्न सोहळा म्हटलं की सर्वात आधी संगीत सोहळ्याची चर्चा सुरु होते. खेडे-गावात आजही लग्नाच्या एक दिवस आधी महिलांची महफिल सजते. यावेळी पारंपरिक विवाह गीतांसोबत काही बॉलिवूड गाणीही पूर्ण उत्साहाने गायली जातात. याच सदाबहार गीतांमध्ये अभिनेत्री रेखा यांच्या ‘फूल बने अंगारे’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘छोरी कब से हुई जवां’ समाविष्ट आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी रिलीज […]
बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सान्वी तलवारने तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेतल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेता करण कुंद्रासोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. यावेळी तिने काही वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला. ज्यावेळी ही घटना घडली होती, तेव्हाही त्याची प्रचंड चर्चा झाली होती. आता सान्वीने त्यावर मौन सोडत सेटवर किती अवघड परिस्थिती […]
मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या होत्या. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे असंख्य व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर सेलिब्रिटींकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनीही फेसबुकवर भलीमोठी […]
नेटफ्लिक्सवरही ‘धुरंधर’चा बोलबाला; फक्त 6 महिन्यात जगभरातून तब्बल इतके व्ह्यूज
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये तुफान गाजले. बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ओरमॅक्स मीडियाच्या सहामाही स्ट्रीमिंग रिपोर्टमध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून 'धुरंधर'ने आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेटफ्लिक्सच्या नव्या एंगेजमेंट रिपोर्टमध्ये जागतिक स्तरावर 'धुरंधर' हा नेटफ्लिक्सचा सर्वांत […]