• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Budh Gochar 2026: कर्क राशीत असलेल्या बुध ग्रहाला सूर्यग्रहण ग्रासणार, 5 ऑगस्टपासून या राशींनी जरा सावधच

August 4, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रातील ग्रहस्थितीवरून बुध ग्रह मिथुन राशीत आहे. 5 ऑगस्टला बुध ग्रह मार्गक्रमण करणार आहे. मिथुन राशीतून चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत बुध ग्रह 22 ऑगस्टपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे याच राशीत 12 ऑगस्टला सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण कर्क राशी आणि अश्लेषा नक्षत्रात लागत आहे. अश्लेषा नक्षत्र हे बुध ग्रहाचे स्वतःचे नक्षत्र आहे. त्यामुळे बुध ग्रहावरही सूर्यग्रहणाचा प्रभाव असणार आहे. सूर्यग्रहणामुळे बुधाची शक्ती काही प्रमाणात क्षीण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही सूर्यग्रहणाचा ग्रहांवर आणि मानवी जीवनावर होणारा प्रभाव हा ग्रहण संपल्या संपल्या लगेच संपत नाही. 12ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रभाव तीव्र असेल. त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होत जाईल. सूर्यग्रहण आणि बुधाच्या स्थितीमुळे काही चार राशींवर थोड्या अधिक प्रमाणात नकारात्मक प्रभाव पडेल. कर्क, सिंह, मकर आणि धनू राशीत प्रभाव दिसून येईल.

कर्क : या राशीतच सूर्यग्रहण होणार आणि प्रथम स्थान असणार आहे. त्यात बुध ग्रहाचा प्रभाव असेल. त्यामुळे या कालावधीत आरोग्याचे प्रश्न उभे राहतील. इतकंच विचारांचं काहूर माजेल आणि आत्मविश्वासात उणीव दिसून येईल. ताण, चिडचिड आणि डोकेदुखीसराखे आजार बळावतील. चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक फटका बसू शकतो. उपाय: दररोज पाण्यात गंगाजल मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा.

सिंह : या राशीच्या 12व्या म्हणजे व्यय स्थानात सूर्यग्रहण होत आहे. हे स्थान खर्च, नुकसान आणि हॉस्पिटलचं स्थान दाखवणार आहे. त्यात या राशीचा स्वामी सूर्य आह. अशा स्थितीत हा काळ कठीण असणार आहे. सूर्याच्या स्थितीमुळे निर्णय घेताना डोलायसमान स्थिती असेल. कोर्ट कचेरीचे वाद उफाळून येईल. नाहक धावपळ होईल. इतकंच काय तर आरोग्याशी निगडीत खर्चात वाढ होईल. उपाय: प्रत्येक बुधवारी एका गरीब व्यक्तीला जेवण द्या.

मकर : या राशीच्या सप्तम स्थानात सूर्यग्रहण होत आहे. त्यामुळे या राशीच्या भागीदारी स्थानात असल्याने गैरसमज निर्माण होतील. पत्नी पतीमध्ये वाद होतील. इतकंच काय तर व्यावसायिक भागीदारीमध्ये वाद विकोपाला जाईल. भागीदारी तुटण्याची भीती अधिक असेल. उपाय: दररोज ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा 108 वेळा जप करा.

धनू : या राशीच्या आठव्या स्थानात ग्रहण होत आहे. हे स्थान संकट आणि मृत्यू स्थान म्हणून गणलं जातं. हे स्थान ज्योतिषशास्त्रात अशुभ मानलं जातं. यामुळे कामात मोठे अडथळे येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. शक्यतो प्रवास टाळा. उपाय: दररोज शिवलिंगावर जलाअभिषेक करावा.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in