• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BJP New Team : अमित मालवीय यांचा पत्ता कट, कोण आहेत भाजपचे नवे सोशल मिडिया हेड दीपक म्हस्के?

August 17, 2026 by admin Leave a Comment


भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात त्यांच्या सोशल मीडियाची नेहमी चर्चा होते. गेल्या कित्येक वर्षांपासून अमित मालवीय हे भाजपच्या सोशल मीडियाची जबाबदारी संभाळत होते. ते भाजपच्या सोशल मिडिया टीमचे प्रमुख होते. पण आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी टीमची घोषणा झाली. यात अमित मालवीय यांच्याजागी दीपक म्हस्के यांच्यावर सोशल मीडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दीपक म्हस्के यांच्यावर राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकाची जबाबदारी सोपवून भाजपने डिजिटल रणनिती अजून मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. दीपक म्हस्के हे दीर्घकाळापासून पक्षाची सोशल मिडिया मोहिम आणि डिजिटल घडामोडींशी संबंधित होते.

दीपक म्हस्के हे छत्तीसगडशी संबंधित भाजपं नेते आहेत. ते आधी राष्ट्रीय प्रवक्ते होते. पक्षाच्या संघटनात्मक आणि मीडियाशी संबंधित कामांमध्ये सुद्धा त्यांनी सक्रीय भूमिका बजावली आहे. अलीकडच्या काही वर्षात ते छत्तीसगढ मेडिकल सर्विसेज कॉर्पोरेशनच्या चेअरमन पदावर सुद्धा होते. दीपक म्हस्के यांना छत्तीसगढ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.

डिजिटल रणनितीक क्षमतेवर विश्वास दाखवला

रायपूर येथे राहणाऱ्या दीपक म्हस्के यांच्याकडे भाजपचे टेक-सेवी, कर्तुत्ववान आणि रणनितीक विचार असलेले युवा नेते म्हणून पाहिलं जातं. त्यांनी पक्षाचं डिजिटल कॅम्पेन आणि सोशल मिडिया विभागाला मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. येणाऱ्या निवडणुका आणि डिजिटल वातावरण लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्या डिजिटल रणनितीक क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. त्यांना महत्वाची राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे.

नितीन नबीन यांचे निकटवर्तीय

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे छत्तीसगडचे प्रभारी होते. त्यावेळी छत्तीसगढमध्ये दीपक म्हस्के यांनी नितीन नबीन यांची बरीच मदत केली होती. नितीन नबीन यांचे निकटवर्तीय असल्याने दीपक म्हस्केंना राष्ट्रीय सोशल मिडिया संयजोकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष बदलले पण अमित मालवीय कायम होते

अमित मालवीय हे वर्ष 2015 पासून भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलच्या राष्ट्रीय संयोजक पदाची जबाबदारी संभाळत होते. या दरम्यान अनेक राष्ट्रीय अध्यक्ष बदलले गेले. पण अमित मालवीय आपल्याजागी कायम होते. नितीन नबीन यांची नवीन टीम बनल्यानंतर अमित मालवीय यांना आयटी सेल प्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. नव्या कार्यकारिणीत प्रीति गांधी यांना आयटी सेलच्या सहसंयोजक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in