• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Baba Vanga Prediction 2026: सुखाचा शिडकावा, नशीब पालटणार.. या 5 राशींना धन आणि करिअरविषयी आनंदवार्ता…बाबा वेंगाचे भाकीत काय?

May 24, 2026 by admin Leave a Comment


Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: बाबा वेंगाच्या भाकीतविषयी जगभरात आजही उत्सुकता आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्याविषयी बाबा वेंगाचं भाकीत चर्चेत आलं आहे. 25 ते 31 मे दरम्यान बाबा वेंगाशी संबंधित भविष्यवाणी चर्चेत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मेष, कर्क यासह 5 राशींचे नशीब पाटलणार आहे. या राशींची करिअरमध्ये प्रगती होईल. पैसा हाती येईल आणि आरोग्य सुधारेल.

मेष राशीविषयी बाबा वेंगाची भविष्यवाणी

बाब वेंगानुसार मेष राशीच्या लोकांसाठी 25 ते 31 मे हा कालावधी आत्मविश्वास आणि ऊर्जेने भरलेला असेल. तुमचे नशीब चमकेल. नोकरदारांना कार्यालयात नवीन जबाबदारी मिळेल. प्रगतीचा रस्ता मोकळा होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. कुटुंबातील कुरबुरी आणि कलह दूर होतील. कुटुंबात सुख आणि शांती नांदेल. गेल्या काही दिवसांपासून थांबलेले काम मार्गी लागेल.

कर्क राशींच्या लोकांना लॉटरी

कर्क राशीच्या लोकांना हा शेवटचा आठवडा फलदायी असेल. त्यांना आर्थिक लाभ मिळतील. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात एकदाच अनेक कामे पूर्ण होतील. त्यामुळे हायसं वाटेल. यामुळे उडालेली धावपळ थांबेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदार वर्गाला कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रलंबित प्रकल्प झटपट पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात चांगली वेळ येईल.

सिंह राशीच्या लोकांसाठी गृह खरेदीचा योगा

बाबा वेंगानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी 25 ते 31 मे दरम्यान सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. त्यांना आर्थिक प्राप्तीचा मार्ग मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसांपासून घर घेण्याची इच्छा या आठवड्यात अंतिम टप्प्यात येऊ शकते. जमीन खरेदीचाही योग आहे.

वृश्चिक राशींसाठी काय भाकीत

बाबा वेंगानुसार, वृ्श्चिक राशीच्या लोकांसाठी 25 ते 31 मे हा कालावधी फायदेमंद असेल. या आठवड्यात करिअर, व्यापार, व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी, समस्या गायब होतील. या आठवड्यात आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. जवळची व्यक्ती मदतीला धावून येईल. मित्र सुद्धा मदत करेल. धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही योग आहेत. प्रवास फायदेशीर ठरतील.

कुंभ राशींच्या व्यक्तीला नवीन नोकरीची संधी

गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या क्षेत्रात ताण तणावाचे वातावरण होते. ते निवळेल. तर ज्यांनी नवीन नोकरीसाठी अर्ज केला आहे. त्यांना एखादा कॉल आल्यास नवल वाटू देऊ नका. नवीन नोकरीची संधी चालून येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना तयार करत असाल तर अधिकमास लाभदायक ठरेल. अडकलेला पैसा परत येईल. काही सामाजिक कार्यातही तुमचा सहभाग असेल.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in