अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात दाऊद इब्राहिम याचा खास मानला जाणार हस्तक आणि इंटरपोलचा वाँटेड गुंड अख्तर मर्चंट याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मर्चंट हा गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. 2023 साली काशीमीरा येथील बेकरीवर गोळीबार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, याच प्रकरणात तो वाँटेड होता. इंटरपोलच्या वाँटेड लिस्टमध्येही त्याच्या नावाचा समावेश होता. इंटरपोलच्या सूचननेनुसार, पोलिसांनी […]
मुस्लिमाला असा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? महाराष्ट्रातील अभिनेत्रीला केरळात असा सवाल, सोशल मीडियावर राडा
आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त महाराष्ट्रातील एक अभिनेत्री नुकतीच केरळला गेली होती. तिथल्या पत्रकारांशी संवाद साधताना अचानक तिला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यामुळे क्षणभरासाठी ती सुद्धा थबकली होती. ‘खलिफा: द इन्ट्रो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मालविका शर्मा केरळला गेलो होती. चित्रपटाबद्दल विविध प्रश्नोत्तरं सुरू असताना अचानक मालविकाला वेगळाच सवाल करण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर काय आणि […]
निदर्यी तीन मुली… बापाचा अंतिम संस्कार फक्त व्हिडिओवरून पाहिला, 13 व्यालाही आल्या नाहीत, नेटकरी संतापले
कौटुंबिक नात्यांना हादरवून टाकणारा एक अत्यंत भावुक प्रकार अलीकडेच समोर आला होता. एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध शिवचरण राम रतन गुप्ता यांचा ४ ऑगस्टला मृत्यू झाला होता. त्यांच्या तीन मुली होत्या, पण एकही मुलगी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आली नव्हती. त्यामुळे वृद्धाश्रमाच्यावतीने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुली व्हिडिओ कॉलवर जोडल्या होत्या. अस्थी विसर्जनाच्या वेळीही मुली व्हिडिओ […]
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाने… फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. खासदारांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात ही नोटीस आहे. संजय देशमुख हे बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दुसऱ्या गटात सामील झाले होते. संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांनी बंडखोरी केल्याचा आरोप करत अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल […]
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यातील यशदा सेंटरमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वे एकाच मंचावर उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा कार्यक्रम शिवाजीराव देशमुख लिखित आठवणींची ओंजळ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी शरद पवार आणि नितीन […]
गोविंदाच्या अफेअरचं सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून समर्थन! सुनीताला दिलं सडेतोड उत्तर
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून पत्नी सुनीता आहुजा हिच्याकडून होत असलेले आरोप आणि कथित एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयरमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत व्हायरल होत आहेत. अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं. पण बॉलिवूडचा दंबग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने गोविंदाचं समर्थन […]