महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दाखल झालेली ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या ५७ संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने काय म्हटलं? […]
Suraj Chavan : अजित पवार ते रितेश देशमुख.. सुरज चव्हाण याच्या लग्नाला कोण-कोण येणार ? त्या खास नावाने वेधलं लक्ष
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, प्रसिद्ध रील स्टार,अनेकांचा लाडका सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा त्याच्या आयुष्याची नवी सुरूवात करत आहे. संजना गोफणे हिच्याशी त्याचा उद्या (शनिवार, 29 नोव्हेंबर) विवाह होणार असून संध्याकाळी 6.11 चा मुहूर्तही समोर आला आहे. मात्र त्यापूर्वीच सकाळी सुरज-संजनाचा साखरपुडा होणार असून नंतर हळदही पार पडेल. त्याच्या लग्नाचे एकेक विधि […]
Ram Mandir Dharma Dhwaja : मी दलित आहे म्हणून मला…राम मंदिरात धर्म ध्वजा स्थापनेनंतर अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद का भडकले?
अयोध्येत आज राम मंदिरात धर्म ध्वजा रोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद दिसले नाहीत. आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं, असा दावा अवधेश प्रसाद यांनी केला आहे. त्यावर त्यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी दलित समाजातील असल्याने मला रामलला दरबारात धर्म ध्वजा स्थापना कार्यक्रमासाठी बोलावलं नाही” असा आरोप अवधेश प्रसाद यांनी केला […]
महिलांनो हार्मोनल असंतुलनाकडे करयात दुर्लक्ष? वाढतील समस्या… जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजार डोकंवर काढत आहेत… ज्याबद्दल आपण कधी ऐकलं देखील नसतं… ऑफिसचं काम, घराची जबाबदारी, मुलांची काळजी, ताण… यांसारख्या गोष्टींमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो… अशात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो… जेव्हा कोणत्याही कारणास्तव हार्मोन्सची पातळी खूप जास्त किंवा खूप कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. या बदलांचे परिणाम […]
Local Body Election: कोकणात काँग्रेसला खिंडार तर बीडमध्ये शरद पवार यांना धक्का; मतदानाला चार दिवस बाकी असतानाच राज्यात घडामोडींना वेग
Congress-Sharad Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50 आरक्षणाची मर्यादा न ओलांडता आणि याविषयीच्या याचिकांच्या निकालाधीन राहून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी वेळ वाढवून दिला. दरम्यान रणधुमाळीला वेग आला असतानाच अनेक पक्षांना मोठा फटका बसला आहे. त्यात कोकणात काँग्रेसला खिंडार पडले […]
Suraj Chavan Wife Mehendi : संजनाच्या हातावर लागली सुरज चव्हाणच्या नावाची मेहंदी ! खास डायलॉगने वेधलं लक्ष
बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचं नवं घर तयार असून त्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच त्याने शेअर केला. पत्र्याची खोली ते आलिशान बंगला असा त्याचा घराचा कायापालट झाला असून तो व्हिडीओ पाहून चाहते खूप खुश झाले. त्यांनी भरभरून कमेंट्स करत सुरजला शुभेच्छा दिल्या, मात्र आता त्याचे चाहते आणखीनच उत्सुक […]