कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. फक्त धर्मेंद्र प्रधान यांचाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपके यांनी केली. अभिजीत दिपकेने म्हटले की, हे जेंनझी त्यांच्या आई […]
चांगला पाऊस पडू दे… पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पुण्यातील विठ्ठल वारीचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पुणे शहरासह परिसरातील हजारो वारकरी आणि भाविक मंदिरात दाखल झाले असून, दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला […]
Rhiya Ahir : हिंमतीनं पोलिसांची व्हॅन अडवली, पण एका भीतीमुळे 2 रात्र उडली रियाची झोप, अखेर वेदना समोर आल्याच
Rhiya Ahir : दिल्ली येथील जंतरमंतर येथे सुरु झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यांवर उतरत आंदोलन करत आहेत. 22 जुलै रोजी मुंबईत देखील आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एका तरुणीच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. आंदोलना दरम्यान […]
50 ग्रॅम पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू समोर; त्यादिवशी कारमध्ये नेमकं काय घडल? CJP आंदोलकाने सगळं सांगितलं
नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यानंतर आंदोलकांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाची पोलखोल केली होती. आंदोलकांनी पोलिसाचा धमकी देतानाचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला होता. या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पोलीस प्रशासनाकडून जोरदार टीका झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी […]
सरकारचा मोठा निर्णय, नीट पेपरफुटीनंतर NTA मध्ये बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया,थेट..
देशभरात नीट पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकार पेपरफुटीविरोधात कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. पेपरफुटीमध्ये एनटीएच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप होत होता. अखेर सरकारने मोठे पाऊल उचलत ठपका […]
टीव्ही इंडस्ट्रीत बिनधास्त ड्रग्जची पार्टी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, स्वत:ही घेतलं कोकेन
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’, ‘कुसुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री नारायणी शास्त्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार ड्रग्जचं सेवन करतात, असा दावा तिने केला आहे. मात्र यावेळी तिने ठराविक कलाकाराचं नाव घेतलं नाही. परंतु सर्वसामान्यपणे मनोरंजनसृष्टीत काम करणारे बहुतांश लोक ड्रग्ज […]