• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Astrology 2026: गुरूनंतर शुक्र 8 जूनला कर्क राशीत करणार प्रवेश, कन्या-तूळ आणि वृश्चिक राशीला फायदा

June 4, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रानुसार, कधी कधी ग्रहांचा गोचर पटापट बदलत असतो. त्याचा राशीचक्रावर आणि त्या त्या व्यक्तीच्या राशीवर परिणाम होत असतो. दोन दिवसांपूर्वी गुरू ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. आता गुरू पाठोपाठ शुक्रही कर्क राशीत येणार आहे. शुक्र हा प्रेम, सुख आणि संपत्तीचा कारक आहे. त्यामुळे गुरू आणि शुक्र यांची युती कर्क राशीत होणार आहे. त्यामुळे गुरूचं बळ आणि शुक्रामुळे आणखी बळ मिळणार आहे. कर्क राशी तसं पाहिलं तर भावुक राशी गणली जाते. या राशीत गुरू आणि शुक्राची युती खास असणार आहे. या काळात कौटुंबिक पातळीवर आणखी आनंद मिळणार आहे. त्यात कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या जातकांना जास्त लाभ मिळणार आहे. कारण या दोन्ही संघांची स्थिती त्या राशीच्या लाभस्थानात होणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशींबाबत…

या तीन राशींना मिळणार लाभ

कन्या : या राशीच्या अकराव्या स्थानात गुरू आणि शुक्राची युती होत आहे. त्यामुळे हा काळ कन्या राशीच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ज्या कामाच्या मागे लागला आहात ते कामं पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कामात वडिलधाऱ्या व्यक्तींची साथ मिळेल. शिक्षण असो की प्रेम तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. घरात शुभ कार्य होऊ शकते.

तूळ : या राशीच्या दहाव्या स्थानात गुरू आणि शुक्र एकत्र येणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचं कौतुक होईल. त्यांना करिअरमध्ये नवी ओळख मिळेल. तुमच्या कामाची स्तुती केली जाईल. जर तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल तर तुम्हाला नवे ग्राहक मिळतील. कौटुंबिक जबाबदारी मिळेल, पण सर्वांची साथही लाभेल.

वृश्चिक : या राशीच्या नवव्या स्थानात गुरू आणि शुक्राची युती होत आहे. त्यामुळे हा काळ प्रवासासाठी आणि काही नवीन गोष्टी करण्यासाठी योग्य आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमची चांगली गट्टी जमेल. काही गोष्टींवर एकमत होईल. कुठे फिरण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे. वडिलधाऱ्यांचा सल्ला तुमच्या कामी येईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in