• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला

July 20, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने सुरु केलेलं आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याने CJP ने संसद भवनावर मोर्चा काढला. पण हा मोर्चा संसद भवनापासून 150 मीटर अंतरावर थांबवण्यात आला. यावेळी संसदेचे सर्व गेट्स बंद करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आज सकाळपासूनच दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडल्या. तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. यांची एकच मागणी होती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नीट परीक्षेचा पेपर लीक झाला. त्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना त्रास झाला. काही विद्यार्थ्यांनी जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. कुठतेरी सरकारने याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांना पदावरुन हटवावं अशी मागणी सीजेपीच्या आंदोलकांनी केली.

अशाच आंदोलनातून आम आदमी पार्टी उभी करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी आता पंजाबमध्ये आहे. मी सोशल मीडियावर पाहतोय, जंतर-मंतरवर देशातील लाखो युवा मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. पण सरकार त्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे. हे योग्य नाही” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. “मी सरकारला आवाहन करतो की, ही आपल्या देशाची मुलं आहेत. न्याय मागण्यासाठी ते रस्त्यावर उतरलेत. अहंकार सोडा, त्यांचं म्हणणं ऐका” असं केजरीवालांनी म्हटलं आहे.

संसदेकडे जाणाऱ्या सहाही मार्गावर मोठा बंदोबस्त

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी बनवली. काहीही झालं तरी आंदोलक यापुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण संसद भवन परिसराला पोलीस छावणीच स्वरुप आलं आहे. संसदेकडे जाणाऱ्या सहाही मार्गावर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संसद भवनाच्या परिसरापर्यंत आंदोलक पोहोचले होते. आंदोलक अद्यापही आंदोलनावर, मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. जेपी नड्डा यांच्याकडून चर्चेसाठी बोलवण्यात आल्याच सीजेपीकडून सांगण्यात आलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in